अमेरिकन व्यावसायिकावरून गदारोळ; भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 08:36 IST2024-12-07T08:36:09+5:302024-12-07T08:36:28+5:30
कामकाज सुरू होताच लोकसभा तहकूब

अमेरिकन व्यावसायिकावरून गदारोळ; भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर अदानी समूह, मणिपूर हिंसाचारासह विरोधी पक्षाने विविध मुद्दे लावून धरल्याने पहिला आठवडा वादळी ठरला. दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी व बुधवारी संसदेचे कामकाज नीट चालले. मात्र,विरोधक बाह्यशक्तींच्या मदतीने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केल्यानंतर गुरुवारी संसदेचे कामकाज तहकूब झाले होते. शुक्रवारीदेखील भाजप खासदार निशकांत दुबे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे संबंध अमेरिकन व्यावसायिक जॉर्ज सोरोस यांच्याशी जोडल्याने सुरुवातीला लोकसभेचे कामकाज थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात झाले.
शून्य प्रहरात गदारोळाला सुरुवात
सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य प्रहरात दुबेंनी "कांग्रेस का हाथ सोरोस के साथ " असे म्हणत विरोधकांना लक्ष्य केले. त्यानंतर पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी शून्य प्रहर सुरू करत दुबेंना बोलण्याची संधी दिली.
मात्र, त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर काँग्रेस • सदस्यांनी आक्रमक होत गदारोळ सुरू केला. दरम्यान, दुबेंनी राहुल गांधींना दहा प्रश्न विचारणार असल्याचे स्पष्ट करत लोकसभा विरोधी पक्षनेत्याचे जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध जोडले.
यावर अक्षेप घेत काँग्रेस सदस्यांनी आसनाजवळ येत 3 घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
संसद परिसरात काँग्रेस खासदारांचा मोर्चा
■ अदानी समूहाशी निगडित मुद्द्यावरून काँग्रेससह इंडिया आघाडीच्या अनेक घटक पक्षांनी शुक्रवारी संसद परिसरात निदर्शने करत मोर्चा काढला. • हातात संविधानाची प्रत धरलेल्या काँग्रेस खासदारांनी तोंडाला काळी पट्टी बांधली होती. ■ लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
पात्रांविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटी
■ भाजप नेते संबित पात्रा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहु गांधींना देशद्रोही म्हटल्यामुळे काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतल आहे. याप्रकरणी काँग्रेसचे खासदार हिबी ईडेन यांनी पात्रांविरोध विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठविली आहे.
भाजप खासदार पात्रांचे वक्तव्य अवमानकारक, असंसदीय व घटनाबाह्य असल्याचा आरोप ईडेन यांनी केला. ५ डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना पात्रांनी राहुल गांधी यांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केल्याचा दावा ईडेन यांनी केला आहे.
चिनी तंत्रज्ञांना अधिक संख्येने व्हिसा द्या
नवी दिल्ली : भारतात अनेक खासगी कंपन्यांनी चिनी बनावटीर्च यंत्रसामग्री खरेदी केली आहे. ही यंत्रे चालविण्यासाठी चिनी तंत्रज्ञांना आतापेक्षा अधिक संख्येने व्हिसा देण्यात यावेत, अशी मागणी राजदचे खासदार ए. डी. सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत केंद्र सरकारकडे केली.