बँकेच्या ATMमधून चुकून १०० ऐवजी ५००च्या नोटा निघू लागल्या अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 09:00 PM2021-09-25T21:00:02+5:302021-09-25T21:03:51+5:30

कॅनरा बँकेच्या एटीएमधून तांत्रिक चुकीमुळे निघू लागल्या ५०० च्या नोटा

In UPs Banda Faulty Canara Bank ATM Disburses Rs 2 60 Lakh in 2 Hours | बँकेच्या ATMमधून चुकून १०० ऐवजी ५००च्या नोटा निघू लागल्या अन् मग...

बँकेच्या ATMमधून चुकून १०० ऐवजी ५००च्या नोटा निघू लागल्या अन् मग...

Next

बांदा: उत्तर प्रदेशतल्या बांदा येथे स्टेशन रोड परिसरात असलेल्या कॅनरा बँकेच्याएटीएम तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानं १०० ऐवजी ५०० च्या नोटा निघू लागल्याचा प्रकार घडला. एटीएममधून अधिक रुपये निघत असल्याची बातमी पसरली आणि लगेच तिथे ग्राहकांची लांब रांग लागली. अवघ्या काही मिनिटांत जवळपास ३० ग्राहकांनी एटीएममधून २ लाख ६० हजार रुपये काढले. त्यामुळे एटीएममधील रोकड संपली. 

कॅनरा बँकेच्या कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती समजताच त्यांनी एटीएम बंद केलं. एटीएममधून रोख रक्कम काढणाऱ्या ग्राहकांची यादी बँक कर्मचाऱ्यांनी तयार केली आणि वसुली सुरू केली. एटीएम सेन्सरमध्ये बिघाड झाल्यानं हा प्रकार घडला. 'एटीएममध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानं १०० ऐवजी ५०० च्या नोटा निघू लागल्या. एटीएम बंद करेपर्यंत ३० ग्राहकांनी २ लाख ६० हजार रुपये काढले. या ग्राहकांकडून पैशांची वसुली करण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे. काही व्यक्तींनी एटीएममधून काढलेली रक्कम परत केली आहे. तर काहींकडून रोख वसूल करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे,' अशी माहिती बँकेतील एका अधिकाऱ्यानं दिली.

भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण; काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारलं

एटीएममधून काढण्यात आलेली रक्कम परत मिळावी यासाठी बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत मागितली आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. 'कॅनरा बँकेच्या स्टेशन रोड एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अतिरिक्त रक्कम काढली गेली. हे सगळे व्यवहार ३० जणांकडून करण्यात आले. या सर्व व्यक्तींकडून अतिरिक्त पैसेदेखील वसूल करणं आवश्यक आहे. या कामात पोलिसांच्या मदतीची गरज आहे,' असं बँक अधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Web Title: In UPs Banda Faulty Canara Bank ATM Disburses Rs 2 60 Lakh in 2 Hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.