मायावती विजेच्या उघड्या तारेसारख्या, हात लावेल त्याचं मरण निश्चित; मंत्र्यांचं 'शॉकिंग' विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 05:55 PM2019-08-28T17:55:32+5:302019-08-28T17:56:11+5:30

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नवनियुक्त मंत्री गिर्राज सिंह धर्मेश यांनी मायावतींविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. ...

UP's Ministers give controversial statement on Mayawati | मायावती विजेच्या उघड्या तारेसारख्या, हात लावेल त्याचं मरण निश्चित; मंत्र्यांचं 'शॉकिंग' विधान

मायावती विजेच्या उघड्या तारेसारख्या, हात लावेल त्याचं मरण निश्चित; मंत्र्यांचं 'शॉकिंग' विधान

Next

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नवनियुक्त मंत्री गिर्राज सिंह धर्मेश यांनी मायावतींविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. मायावती ह्या विजेच्या उघड्या तारेसारख्या आहेत. जो त्यांच्याजवळ जाईल, तो मरून जाईल, अशी मुक्ताफळे या मंत्रिमहोदयांनी उधळली. 

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामाध्ये गिर्राज सिंह धर्मेश यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडे समाजकल्याण, अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण विभागाचे मंत्रिपद सोपवण्यात आले होते. मायावतींवर टीका करताना ते म्हणाले की,''कायदेशीपणे ब्रह्मदत्त द्विवेदी यांनी मायावतींचे प्राण वाचवले होते. भाजपाने मायावतींना तीन वेळा मुख्यमंत्री केले. ही बाब त्यांना माहीत असेलच.'' 

 ते पुढे म्हणाले की, मायावती कुणाच्याही सख्ख्या होऊ शकत नाहीत. समाजवादी पक्षालाही त्यांनी दगा दिला आहे. त्या शुन्यावर होत्या, लोकसभा निवडणुकीत दहावर पोहोचल्या आणि सपा पाच जागांवरच अडखळली. त्या विजेच्या उघड्या तारेसारख्या आहेत. जो त्यांना हात लावेल तो तिथेच मरेल.'' 

 कांशीराम यांचा मृत्युसुद्धा संशयास्पद परिस्थितीत झाला, असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. तसेच त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यासंदर्भात मागणी करणार आहे, असे गिर्राज सिंह धर्मेश पुढे म्हणाले. मायावतींनी जी अमाप संपत्ती गोळा केली आहे, त्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे मायावतींसमोर आता फार पर्याय उरलेले नाहीत. त्यातच भाऊ आनंद कुमार यांचा प्लॉट जप्त केल्यानंतर मायावती घाबरलेल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला. 
 
 

Web Title: UP's Ministers give controversial statement on Mayawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.