UPची लोकसंख्या 25 कोटी, पण कुंभमेळ्यात किती लोकांनी स्नान केलं? खुद्द योगींनीच सांगितला आकडा; तुम्हीही थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:12 IST2025-02-12T18:10:29+5:302025-02-12T18:12:27+5:30
"हा नवा उत्तर प्रदेश आहे. 25 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि कालपर्यंत 50 कोटी लोकांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केले आहे."

UPची लोकसंख्या 25 कोटी, पण कुंभमेळ्यात किती लोकांनी स्नान केलं? खुद्द योगींनीच सांगितला आकडा; तुम्हीही थक्क व्हाल
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "हा नवा उत्तर प्रदेश आहे. 25 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि कालपर्यंत 50 कोटी लोकांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केले आहे." यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला.
हा नवा उत्तर प्रदेश -
बागपतमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ""आज, माघी पौर्णिमेच्या निमित्ताने, कोट्यवधी लोक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पवित्र स्नान करत आहेत. हा नवीन उत्तर प्रदेश आहे, 25 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि कालपर्यंत ५० कोटी लोकांनी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले आहे. मात्र, काही लोकांना लपून-छपून असे करयची सवय आहे. त्यांनी कोरोनाची लस घेतली, पण जगाला लस घेऊ नका, असे सांगत होते. त्यांनी लपून-छपून संगमावर स्नान केले, मात्र लोकांना सांगतायत स्नान करू नका."
माघी पौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी -
आज माघी पौर्णिमेनिमित्त महाकुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. संगम तटाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर भाविक दिसत होते. महत्वाचे म्हणजे भाविकांचा उत्साह एवढा प्रचंड होता की, १ कोटी भाविकांनी तर पहाटेच्या सुमारासच संगमावर स्नान केले. हा आकडा आता १.८३ कोटींहूनही अधिक झाला आहे.
आज माघी पौर्णिमेनिमित्त, नागा साधूंच्या आखाड्यांनी सर्वप्रथम स्नान केले. यानंतर इतर आखाडे आणि नंतर साधू-संतांनी स्नान केले. यानंतर, सामान्य भाविकांनी स्नान करण्यास सुरुवात केली. आज संगम नदीच्या काठावर स्नान करणाऱ्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जात आहे. आतापर्यंत ४६.२५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले आहे.