उपसरपंच, सदस्यांनीच ठोकले ग्रामपंचायतला कुलूप ममुराबाद येथील प्रकार : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचा आरोप
By admin | Published: August 1, 2016 11:56 PM2016-08-01T23:56:55+5:302016-08-01T23:56:55+5:30
जळगाव : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून गावात काम न करता त्यात गैरव्यवहार होऊन या रकमेचा हिशेब मिळत नसल्याने सोमवारी सकाळी ममुराबाद येथे उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनीच ग्रामपंचायतला कुलूप ठोकले. दरम्यान, या रकमेतून गावात काम केल्याचा दावा ग्रामसेवकांनी केला आहे.
Next
ज गाव : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून गावात काम न करता त्यात गैरव्यवहार होऊन या रकमेचा हिशेब मिळत नसल्याने सोमवारी सकाळी ममुराबाद येथे उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनीच ग्रामपंचायतला कुलूप ठोकले. दरम्यान, या रकमेतून गावात काम केल्याचा दावा ग्रामसेवकांनी केला आहे. १८ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा हिशेब लागेना....गावातील विविध कामांसाठी चौदाव्या वित्त आयोगातून ममुराबाद ग्रामपंचायतला १ फेब्रुवारी ते ९ जून २०१६ दरम्यान चार टप्प्यांमध्ये २० लाख १२ हजार ७३५ रुपयांचा निधी मिळाला. यामध्ये ग्रामपंचायतने १ मार्च ते २९ जून २०१६ दरम्यान जेसीबीद्वारे काम करण्यासह पाईप व इतर खरेदीमध्ये १८ लाख ६२ हजार ५०० रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. गावात कामच झाले नाही...एवढी मोठी रक्कम खर्च तर केली मात्र त्यातून गावात एकही काम झालेले दिसत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अखेर कुलूप ठोकले....या रकमेचा हिशेब लागत नसल्याने उपसरपंच प्रमोद शिंदे, सदस्य शरद पाटील, विलास सोनवणे, लोटन पाटील, युवराज पाटील, सरपंच महिलेचे पती हेमंत चौधरी यांच्यासह पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, महेंद्र सोनवणे, मनोज पाटील, आत्माराम सोनवणे यांच्यासह दीडशेच्यावर ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामसेवक पी.बी. अहिरे यांना या खर्च झालेल्या रकमेचा हिशेब विचारला. मात्र नंतर या, लेखी द्या अशी उडवाउडवीचे उत्तरे अहिरे यांनी दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला. मात्र ग्रामसेवक बाहेर निघत नव्हते. त्यावेळी काही सदस्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते बाहेर आले व उपसरपंच प्रमोद शिंदे यांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले.दोन ते तीन सदस्य करतात व्यवहार...ग्रामपंचायतला मिळणार्या निधीतून कोणतेही काम करताना दोन ते तीन सदस्यच व्यवहार करतात. त्यामुळे इतरांना त्याची माहिती नसते. त्यामुळे गैर व्यवहार होत असल्याचे सदस्यांसह ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पासबुक, चेकबुक घेतले ताब्यात....ग्रामसेवकांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने या रकमेबाबत माहिती नाही तर मग व्यवहार कोण करते असा जाब विचारत ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक अहिरे यांच्याकडून ग्रामपंचायतच्या सर्व बँकांचे पासबुक, चेकबुक ताब्यात घेतले.