लय भारी! शेतात काम करून लेकाला शिकवलं, IAS होऊन त्याने आई-बाबांना मोठं सरप्राईझ दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 05:24 PM2023-12-08T17:24:06+5:302023-12-08T17:38:30+5:30

गोपाळने एका मुलाखतीत सांगितलं की, घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अशा परिस्थितीत माझी पहिली प्राथमिकता नोकरी मिळवण्याला होती, जेणेकरून मी माझा घरखर्च भागवू शकेन.

upsc gopal krishna ronanki surprise to his parents by becoming ias without telling them | लय भारी! शेतात काम करून लेकाला शिकवलं, IAS होऊन त्याने आई-बाबांना मोठं सरप्राईझ दिलं

लय भारी! शेतात काम करून लेकाला शिकवलं, IAS होऊन त्याने आई-बाबांना मोठं सरप्राईझ दिलं

UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम आणि शिक्षणाची आवड, सातत्य आवश्यक आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील एका दुर्गम गावातील शेतकऱ्याचा मुलगा गोपाळ कृष्ण रोनांकी याने UPSC 20216 च्या परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावला होता. गोपाळ कृष्ण रोनांकीचे आई-वडील, रोनांकी अप्पा राव आणि रुक्मिणम्मा, श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा ब्लॉकमधील परसांबा गावचे होते आणि ते शेतात काम करायचे.

घरात वीज नव्हती, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने गोपाळ कृष्ण रोनांकीला कधीच खासगी शाळेत पाठवू शकले नाही.आयएएस अधिकारी होण्यापूर्वी गोपाळ कृष्ण रोनांकी हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पूर्वीच्या काळात इंग्रजी शाळांना खूप महत्त्व होते, आजही हेच आहे. बारावीपर्यंत सरकारी शाळेत शिकल्यानंतर टीचर ट्रेनिंग कोर्स केला. 2006 मध्ये सरकारी शिक्षक म्हणून निवड झाली. 

गोपाळने एका मुलाखतीत सांगितलं की, घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अशा परिस्थितीत माझी पहिली प्राथमिकता नोकरी मिळवण्याला होती, जेणेकरून मी माझा घरखर्च भागवू शकेन. नोकरीनंतर गोपाळने आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम येथून पदवी प्राप्त केली. नोकरी मिळाल्यानंतर यूपीएससी परीक्षेचा विचार केला. ग्रॅज्युएशनच्या काळातच यूपीएससीची तयारी सुरू केली.

गोपाळच्या आई-वडिलांना मुलाचं स्वप्न आणि UPSC दरम्यान त्याने केलेल्या प्रयत्नांची अजिबात माहिती नव्हती. आई-वडिलांना माहित नव्हतं की तो UPSC ची तयारी करत आहे. पण जेव्हा गोपाल परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याने आई-वडिलांना - सांगितलं तेव्हा कुटुंबीयांना आश्चर्य वाटलं आणि ते सर्वच खूप आनंदी झाले..

IAS गोपाळ कृष्ण रोनांकीच्या मते, परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत नोट्स तुम्हाला मदत करू शकतात. यासोबतच त्याने सल्ला दिला की, UPSC ची तयारी करणार्‍या उमेदवारांनी चालू घडामोडींसाठी नियमितपणे वर्तमानपत्रं आणि मासिकं वाचावीत. तसेच सतत प्रयत्न करत राहावेत. 
 

Web Title: upsc gopal krishna ronanki surprise to his parents by becoming ias without telling them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.