"मला यशाची पूर्ण खात्री होती", UPSC 2022 ची 'टॉपर' इशिता किशोरचं IAS बनण्याचं स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 03:50 PM2023-05-23T15:50:07+5:302023-05-23T15:50:38+5:30
UPSC 2022 Topper Ishita Kishore : पहिला क्रमांक आल्यानंतर इशिता किशोरने आनंद व्यक्त केला.
ishita kishore upsc 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल आज म्हणजेच मंगळवारी जाहीर केला. दिल्लीच्या इशिता किशोरने पहिला क्रमांक पटकावला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारवारांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येणार आहे. जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत इशिता किशोर (रोल क्र. ५८०९९८६) पहिल्या स्थानावर आहे. पहिला क्रमांक आल्यानंतर इशिताने आनंद व्यक्त केला असून यशाची पूर्ण खात्री होती असे म्हटले.
दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेत असलेल्या इशिताचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. "मला यशाची पूर्ण अपेक्षा होती, पण गुणवत्ता यादीत पहिला क्रमांक मिळणे हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे", असे इशिताने सांगितले. इशिताच्या पाठोपाठ गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा आहेत.
इशिताची 'यशस्वी' झेप
दरम्यान, नागरी सेवा परीक्षा २०२२ ची टॉपर इशिता किशोरने दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेज कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर एका खासगी कंपनीत जोखीम सल्लागार म्हणून नोकरी केली. मात्र, भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न तिला नागरी सेवा परीक्षेकडे घेऊन आले.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर इशिताने नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी CRY, GAIL India Limited यांसह काही खासगी संस्थांमध्ये इंटर्नशिप देखील केली. यानंतर तिने क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातील भारत-चीन युवा शिष्टमंडळात प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. याशिवाय ती एमएनसीमध्ये विश्लेषक देखील बनली, त्यानंतर तिने नागरी सेवा परीक्षेची तयारी केली.
पाहा संपूर्ण यादी
1. इशिता किशोर
2. गरिमा लोहिया
3. उमा हर्थी एन
4. स्मृती मिश्रा
5. मयूर हजारिका
6. गेहाना नव्या जेम्स
7. वसीम अहमद भट
8. अनिरुद्ध यादव
9. कनिका गोयल
10. राहुल श्रीवास्तव
11. परसनजीत कौर
12. अभिनव सिवाच
13. विदुषी सिंग
14. कृतिका गोयल
15. स्वाती शर्मा
16. शिशिर कुमार सिंह
17. अविनाश कुमार
18. सिद्धार्थ शुक्ला
19. लघिमा तिवारी
20. अनुष्का शर्मा
21. शिवम यादव
22. जी व्ही एस पावनदत्ता
23. जी व्ही एस पावनदत्ता