UPSC IAS, IPS परीक्षेचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशभरात टॉपर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 12:54 PM2020-08-04T12:54:15+5:302020-08-04T12:57:01+5:30
यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेच्या मुलाखती 20 जुलैला सुरु झाल्या होत्या. या परिक्षांचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला.
लोकसेवा आयोगाच्या (UPSC) सिव्हिल सर्व्हिस परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये प्रदीप सिंह याने या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळविला असून दुसऱ्या स्थानी जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा यांनी यश मिळविले आहे.
यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेच्या मुलाखती 20 जुलैला सुरु झाल्या होत्या. या परिक्षांचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे ही मुलाखत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आयएएससाठी 180, आयएफएससाठी 24, आयपीएससाठी 150, केंद्रीय सेवा ग्रुप ए साठी 438, ग्रुप बीसाठी 135 जणांची निवड करण्यात आली आहे. एकूण 829 उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये सामान्य गटातून 304, ईडब्ल्यूएसमधून 78, ओबीसीमधून 251, एससी 129 आणि एसटी वर्गातून 67 उमेदवारांना यश मिळाले आहे.
सिव्हिल सेवा परिक्षेतील टॉप 25 जणांची यादी....
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप
RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी