UPSC: IAS टीना डाबी यांची युपीएससी परीक्षेची मार्कशीट व्हायरल, खरी की खोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:03 PM2023-01-27T22:03:00+5:302023-01-27T22:25:21+5:30

टीना डाबी ह्या २०१६ साली आयएएस अधिकारी बनल्या होत्या, २०१५ साली त्यांनी युपीएससी परीक्षेत टॉप केले होते.

UPSC: IAS Tina Dabi's UPSC Exam Marksheet Viral on social media, True or Fake? | UPSC: IAS टीना डाबी यांची युपीएससी परीक्षेची मार्कशीट व्हायरल, खरी की खोटी?

UPSC: IAS टीना डाबी यांची युपीएससी परीक्षेची मार्कशीट व्हायरल, खरी की खोटी?

googlenewsNext

IAS अधिकारी टीना डाबी यांची युपीएससी परीक्षेतील मार्कशीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मार्कलीस्टनुसार युपीएससी परीक्षेत टीना यांना ५२.४९ टक्के गुण मिळाले होते. सध्या त्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. टीना डाबी या युपीएससी टॉपर झाल्यापासून, लग्नापासून ते सध्या सोशल मीडियातून कायम चर्चेत आहेत. कधी त्यांचे फोटो व्हायरल होतात, तर कधी त्यांनी केलेल्या कामामुळे त्या चर्चेत असतात. मात्र, आता त्यांची २०१६ च्या युपीएससी परीक्षेची मार्कशीट व्हायरल झाली आहे. 

टीना डाबी ह्या २०१६ साली आयएएस अधिकारी बनल्या होत्या, २०१५ साली त्यांनी युपीएससी परीक्षेत टॉप केले होते. मध्य प्रदेशची राजधानी भोपालची रहिवाशी असलेल्या टीना या सातत्याने चर्चेत असतात. डाबी यांनी २०१५ मध्ये सेकंड युपीएससी टॉपर राहिलेल्या अतहर आमीरसोबत १०१८ मध्ये लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं लग्न जास्त दिवस टिकलं नाही, २०२१ मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, २० एप्रिल २०२२ साली टीना डाबी यांनी आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत दुसरे लग्न केले. तेव्हीही त्या चर्तेत होत्या.

दरम्यान, आता टीना डाबी यांची युपीएससी परीक्षेची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या परीक्षेत त्यांना ५२.४९ टक्के गुण मिळाले आहेत. निंबध लेखनासाठी त्यांना २५० पैकी १४५ गुण मिळाले आहेत. जीएस फर्स्टमध्ये ११९, जीएस सेकंडमध्ये ८४, जीएस थर्ड आणि फोर्थमध्ये अनुक्रमे १११ व ११० गुण मिळाले आहेत. तसेच, राज्यशास्त्र विषयांत फर्समध्ये, १२८ आणि सेकंडमध्ये १७१ गुण मिळाले आहेत. तर, मुलाखतीत २७५ पैकी १९५ गुण मिळाले होते. दरम्यान, टीना डाबी यांची ही मार्कशीट असली आहे की नकली याबाबत ठोस दावा करण्यात येत नाही. पण, ही व्हायरल होत आहे. 
 

Web Title: UPSC: IAS Tina Dabi's UPSC Exam Marksheet Viral on social media, True or Fake?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.