IAS Interview Questions: कोणत्या देशात वाहतूक सुविधा पूर्णपणे मोफत आहे? वाचा UPSC मुलाखतीतील लक्षवेधी प्रश्न आणि उत्तरं...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:29 PM2022-06-07T12:29:52+5:302022-06-07T12:32:47+5:30
UPSC Interview Tricky Questions: यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्हाला देश आणि जगाविषयी माहिती असणं आवश्यक आहे.
UPSC Interview Tricky Questions: यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्हाला देश आणि जगाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. मुलाखतीत तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासाठी उमेदवारांनी मानसिक तयारी करणं गरजेचं आहे. जे मुलाखतीत अधिक आत्मविश्वासानं उत्तर देतात, त्यांना अपेक्षित यश मिळतं. अनेकदा असे प्रश्नही मुलाखतीत विचारले जातात, जे ऐकून उमेदवार आश्चर्यचकित होतात. आज आपण अशाच काही प्रश्नांची माहिती आणि त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत.
१. कोणत्या देशात सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे फ्री आहे?
उत्तर- लक्झमबर्ग
२. असं कोणतं दुकान आहे की जिथं ग्राहक पैसेही देतो आणि स्वत:ची वस्तूही?
उत्तर- सलून
३. कोणत्या देशात एकही नदी नाही?
उत्तर- सौदी अरेबिया
४. असा कोणता देश आहे जिथं मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते?
उत्तर- आइसलँड
५. कोणत्या प्राण्याचं रक्त निळं असतं?
उत्तर- गोगलगाय, कोळी आणि ऑक्टोपस
६. अशी कोणती गोष्ट आहे की जी खाण्यासाठी खरेदी केली जाते पण ती खाता येत नाही?
उत्तर- जेवणाची भांडी
७. माणूस ८ दिवस झोपल्याशिवाय जिवंत राहू शकतो का?
उत्तर- होय, कोणतीही व्यक्ती रात्री झोपू शकते आणि ८ दिवस जिवंत राहू शकते.
८. पृथ्वीवरील कोणत्या देशात एकही रेल्वे ट्रॅक नाही?
उत्तर- भूतान, सायप्रस, आइसलँड इत्यादी असे देश आहेत की जिथं एकही रेल्वे ट्रॅक नाही.
९. ताजमहालची निर्मिती मुमताजच्या मृत्यू आधी झाली की नंतर?
उत्तर- मुमताज यांचं निधन बुरहानपूर येथे १७ जून १६३१ रोजी झालं होतं. त्यानंतर ताजमहालची निर्मिती झाली ज्याचं काम १६३४ साली पूर्ण झालं.
१०. एका माणसाला फाशीची शिक्षा झाली. त्याला तीन खोल्या दाखविण्यात आल्या. पहिल्या खोलीत आग लागली आहे, दुसऱ्यामध्ये रायफल हाती घेऊन असलेला गुंड उभा आहे, तर तिसऱ्या खोलीत वाघ आहे, ज्यानं तीन वर्षांपासून काही खाल्लेलं नाही. त्यानं काय निवडावं?
उत्तर- तिसऱ्या क्रमांची खोली कारण, वाघ तीन वर्षांपासून भुकेला असेल तर त्याचा इतक्यात मृत्यू झाला असेल.