युपीएससीवरून लोकसभेत पुन्हा गदारोळ
By admin | Published: August 1, 2014 12:40 AM2014-08-01T00:40:05+5:302014-08-01T00:40:05+5:30
युपीएससी परीक्षेवरून गुरुवारी लोकसभेत पुन्हा गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा गंभीरपणे घेतला असून लवकरच संतुलित आणि सामंजस्याने तोडगा काढला जाईल
नवी दिल्ली : युपीएससी परीक्षेवरून गुरुवारी लोकसभेत पुन्हा गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा गंभीरपणे घेतला असून लवकरच संतुलित आणि सामंजस्याने तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
युपीएससीच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याच्या घटनेची समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी तीव्र शब्दांत निंदा केली. शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. हा मुद्दा पंतप्रधानांनी गांभीर्याने घेतला आहे. ते लवकरात लवकर याबाबत अंतिम निर्णय घेतील. हा कोणत्याही पक्षाशी निगडित मुद्दा नाही. सभागृहाची भावना मी पंतप्रधानांना कळवतो, असे आश्वासन संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांनी दिले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)