प्रेरणादायी! 5 वेळा अपयश येऊनही हार नाही मानली; लग्नानंतर 345 वा रँक मिळवत UPSC क्रॅक केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 08:15 AM2022-06-04T08:15:59+5:302022-06-04T08:23:18+5:30

UPSC Result Usha Yadav : उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून महिला भविष्यात प्रगती करू शकतात हे सिद्ध करून दाखवलं आहे.

upsc result usha yadav did preparation with doing job after marriage got 345 rank | प्रेरणादायी! 5 वेळा अपयश येऊनही हार नाही मानली; लग्नानंतर 345 वा रँक मिळवत UPSC क्रॅक केली

फोटो - news18 hindi

Next

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. बहुतेक महिलांना असं वाटतं की, विशेषत: लग्नानंतर पुढील शिक्षण घेणं आणि UPSC सारख्या परीक्षेची तयारी करणं अशक्य आहे. पण रेवाडीची लेक उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून महिला भविष्यात प्रगती करू शकतात हे सिद्ध करून दाखवलं आहे. लग्नानंतर नोकरी करतानाच UPSC ची तयारी केली. जवळपास 5 वेळा अपयश येऊनही हार मानली नाही. अखेर मेहनतीने घवघवीत यश संपादन केलं आहे.  

उषा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना त्यांच्या माहेर आणि सासरच्या दोन्ही बाजूंनी पूर्ण पाठिंबा मिळाला. तसेच, 2019 साली या परीक्षेत निवड झालेल्या त्यांच्या गावातील अभिषेक यादव यांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला हे यश मिळाल्याचं सांगितलं. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 345 वा क्रमांक मिळवणाऱ्या उषा यादव यांनी मिळवलेलं यश महिलांसाठी प्रेरणादायक आहे. उषा यांनी UPSC परीक्षेची तयारी करण्यासोबतच नोकरीही केली. त्यांनी त्यांच्या एका महिन्याच्या मुलालाही काही काळ दूर ठेवून तयारी केली.

(फोटो - news18 hindi)

उषा यादव या परीक्षेत 4 वेळा अपयशी ठरल्या. पाचव्यांदा मुलाखतीतून बाहेर पडल्या. मात्र, असं होऊनही त्यांनी हार मानली नाही आणि अथक प्रयत्नांनंतर अखेर ध्येय गाठलंच. उषा यादव म्हणाल्या की, सासरच्या व सासरच्या दोघांकडूनही पूर्ण सहकार्य होतं. 2019 साली या परीक्षेत निवड झालेल्या त्यांच्या गावातील अभिषेक यादव यांच्या मार्गदर्शनाखालीच हे यश मिळवलं आहे. त्या महेंद्रगड जिल्ह्यातील भाखरी गावच्या असून, त्यांचं लग्न रेवाडी येथील सेक्टर 3 येथील रवी यादव यांच्याशी 2016 मध्ये झालं होतं. त्यांना साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. 

पती-पत्नी दोघांनी एनआयटी मुरथलमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं आणि त्यानंतर दोघांनाही नोकरी मिळाली. सध्या उषा यादव या सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून दिल्लीत कार्यरत आहेत. आपला अनुभव सांगताना उषा यांनी सांगितलं की, नोकरी करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली. परीक्षा जवळ आल्यावर काही काळ रजा घेऊन तयारी केली. सिविल सर्व्हिस परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: upsc result usha yadav did preparation with doing job after marriage got 345 rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.