UPSC Results: महाराष्ट्राचा, मराठीचा झेंडा डौलाने फडकवणारे शिलेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:08 PM2020-08-04T20:08:23+5:302020-08-04T20:08:53+5:30
यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेच्या मुलाखती 20 जुलैला सुरु झाल्या होत्या. या परिक्षांचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला.
नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१९ च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला, यात प्रदीप सिंह नावाचा विद्यार्थी देशात प्रथम आला तर दुसऱ्या स्थानी जतिन किशोर आणि तिसऱ्या स्थानावर प्रतिभा वर्मा यांनी बाजी मारली आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील ५५ विद्यार्थ्यांनीही यश संपादन केले आहे.
यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेच्या मुलाखती 20 जुलैला सुरु झाल्या होत्या. या परिक्षांचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे ही मुलाखत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आयएएससाठी 180, आयएफएससाठी 24, आयपीएससाठी 150, केंद्रीय सेवा ग्रुप ए साठी 438, ग्रुप बीसाठी 135 जणांची निवड करण्यात आली आहे. एकूण 829 उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये सामान्य गटातून 304, ईडब्ल्यूएसमधून 78, ओबीसीमधून 251, एससी 129 आणि एसटी वर्गातून 67 उमेदवारांना यश मिळाले आहे.
महाराष्ट्रातून यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेले शिलेदार
नेहा भोसले (१५), मंदार पत्की (२२), आशुतोष कुलकर्णी (४४) , प्रियंका किशोरे( ६१) , योगेश पाटील (६३), विशाल नरवडे (९१) , राहुल चव्हाण (१०९), कुलदीप जंगम (१३५), नेहा देसाई (१३७), जयंत मंकाळे (१४३), अभयसिंग देशमुख (१५१), अश्विनी वाकडे (२००), सागर मिसाळ (२०४), महादेव गित्ते (२१०), कुणाल चव्हाण (२११), सचिन हिरेमठ (२१३), सुमीत महाजन (२१४), सारांश महाजन (२२४), अविनाश शिंदे ( २२६), शंकर गिरी (२३०), श्रीकांत खांडेकर (२३१), योगेश कापसे (२४९), गौरी पुजारी (२७५), प्रसाद शिंदे (२८७), आदित्य काकडे (३८२) निमीश पाटील (३८९), मयांक स्वामी (३९३), महेश गिते (३९९), कांतीलाल पाटील (४१८) स्वप्नील पवार ( ४४८), ऋषिकेश देसाई (४८१), नवनाथ माने (५२७), प्रफुल्ल देसाई (५३२), विजयसिंहगराव गिते(५५०), समीर खोडे (५५१), सुरेश शिंदे (५७४), अभिनव इंगवले (६२४), प्रियंका कांबळे (६७०) निखील खरे (६८७), सौरभ व्हाटकर (६९५), अक्षय भोसले (७०४), अभिजीत सरकाते (७१०), प्रज्ञा खंदारे (७१९), संकेत धनवे (७२७), शशांक माने (७४३), निखील कांबळे (७४४), राहूल राठोड (७४५), सुमीत रामटेके (७४८), निलेश गायकवाड (७५२), कुणाल सरोटे (७६५), अभय सोनकर (७६७) वैभव वाघमारे (७७१), सुनील शिंदे (८१२), हेमंत नंदनवार (८२२), स्वरूप दीक्षित (८२७)