नेत्रदिपक भरारी! नासाची नोकरी सोडली, IPS अधिकारी झाली; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 11:09 AM2023-09-23T11:09:39+5:302023-09-23T11:10:44+5:30

तरुणीने NASA मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर 5व्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

upsc success anukriti sharma got 23rd rank in ugc net left nasa job became ips officer | नेत्रदिपक भरारी! नासाची नोकरी सोडली, IPS अधिकारी झाली; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

नेत्रदिपक भरारी! नासाची नोकरी सोडली, IPS अधिकारी झाली; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

googlenewsNext

IAS, IPS आणि IFS बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना भारतातील सर्वात कठीण मानली जाणारी UPSC परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक तास मेहनतीने अभ्यास करावा लागतो. त्यापैकी काही मोजकेच लोक या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. एका तरुणीने NASA मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर 5व्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

आयपीएस अधिकारी अनुकृती शर्मा ही राजस्थानमधील अजमेर शहरातील रहिवासी आहे. तिचे वडील 20-पॉइंट विभागात काम करत होते तर आई शिक्षिका होती. जयपूरच्या इंडो भारत इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, कोलकाता येथून बीएसएमएसचे शिक्षण घेतलं. 2012 मध्ये, ह्यूस्टन, टेक्सास येथील राइस विद्यापीठात पीएचडीसाठी निवड झाली. वैभवने अनुकृतीला अमेरिकेला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. 

घरच्यांनी वैभवला आधी लग्न करण्याचा सल्ला दिला. यानंतर दोघांनी 2013 मध्ये लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघेही महिन्याला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावत होते. त्यानंतर ती भारतात परतली. अनुकृतीने 2014 च्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF) परीक्षेमध्ये 23वा क्रमांक मिळवला होता, तर तिचा पती वैभव मिश्रा याने अव्वल स्थान मिळविले होते.

चौथ्या प्रयत्नात IPS

अनुकृती आणि तिचा पती वैभव बनारसमध्ये राहून पुढील तयारी करू लागले. अनुकृती आणि तिच्या पतीने यूपीएससीच्या तयारीदरम्यान एकमेकांना मदत केली. दृढनिश्चयामुळे तिसर्‍या प्रयत्नात ऑल इंडिया 355 वा क्रमांक मिळवण्यात मदत झाली. भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) निवड झाली. यानंतर, आणखी एका प्रयत्नात तिने ऑल इंडिया138 वा क्रमांक मिळवला आणि ती आयपीएस अधिकारी बनली.

पालकांव्यतिरिक्त, अनुकृती शर्मा तिच्या यशाचं श्रेय पतीला देखील देते, ज्याने तिला यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यात मदत केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती सध्या बुलंदशहरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. तिचा नवरा वैभव दिल्लीतील एका कोचिंग फॅकल्टीत शिक्षक म्हणून काम करतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: upsc success anukriti sharma got 23rd rank in ugc net left nasa job became ips officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.