कष्टाचं फळ! सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं; पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर झाली IPS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 02:42 PM2024-11-11T14:42:22+5:302024-11-11T14:43:20+5:30
डॉ. तरुणा कमल खूप प्रेरणादायी आहेत. UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या.
वैद्यकीय अभ्यास आणि यूपीएससी परीक्षा या दोन्हींमध्ये यशस्वी होणं सोपं नाही. परंतु आपल्याकडे अनेक यशस्वी अधिकाऱ्यांची उदाहरणे आहेत ज्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यात करिअर करण्याऐवजी यूपीएससीची सरकारी नोकरी निवडली. हिमाचल प्रदेशातील रहिवासी असलेल्या डॉक्टर तरुणा कमल यांनीही असंच काहीसं केलं. त्यांनी वैंद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
डॉ. तरुणा कमल खूप प्रेरणादायी आहेत. UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. तरुणा कमल यांनी २०२२ मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत २०३ वा रँक मिळवला. त्या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहे. त्या हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी आपलं मेडिकल करिअर सोडलं. आयएएस अधिकारी बनून त्यांनी सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण केलं.
तरुणा कमल यांचे वडील महापालिकेत सफाई कंत्राटदार असून आई नोर्मा देवी गृहिणी आहेत. तरुणा यांचा जन्म २६ जून १९९७ रोजी झाला. त्यांनी मॉडर्न पब्लिक स्कूल, रत्ती येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पालमपूर येथील जीसी नेगी कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्समधून वैद्यकीय पदवी घेतली. वेटरिनरी डॉक्टर म्हणून प्रशिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा विचार आला.
UPSC परीक्षेच्या तयारीसाठी चंदीगड येथील कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. तेव्हा त्यांचं वय २५ वर्षे होतं. तरुणा यांच्या म्हणण्यानुसार, यूपीएससी परीक्षेची तयारी करताना कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या अडचणी कमी झाल्या.