Success Story: चहावाला बनला IAS...रोजचा ७० किमी प्रवास करुन इंग्रजी शिकला, कोचिंग क्लानविना सलग तीनवेळा UPSC क्रॅक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 07:17 PM2022-07-21T19:17:01+5:302022-07-21T19:21:19+5:30
IAS Himanshu Gupta: देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात. पण अगदी पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करता येतं असं नाही.
IAS Himanshu Gupta: देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात. पण अगदी पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करता येतं असं नाही. कारण देशातील कठीण परीक्षांपैकी एक अशी यूपीएससीची परीक्षा समजली जाते. काही उमेदवारांना तर परीक्षा क्रॅक करण्यासाठी कित्येक वर्ष लागतात. पण हिमांशु गुप्ता हे असं नाव आहे की ज्यानं आपल्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. इतकंच नव्हे, तर सलग तीनवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा रेकॉर्ड देखील केला आहे.
२०२० मध्ये देशात १३९ वी रँक पटकावणाऱ्या हिमांशु गुप्ताचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. सलग तीनवेळा परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. UPSC Civil Service परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा असून ती सलग तीनवेळा उत्तीर्ण करणं सोपं नाही. हिमांशु उत्तराखंडच्या सितारगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सर्वसामान्य कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करतो. त्याच्या वडिलांचं एक चहाचं दुकान होतं आणि हिमांशुच दुकान सांभाळायचा. दुकानात बसूनच तो वृत्तपत्राचं वाचन करायचा. यानंतर त्यानं यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
वडिलांच्या चहाच्या दुकानावर करायचे काम
कुटुंबाची ढासळलेली परिस्थिती पाहून हिमांशू वडिलांना शाळा सुटल्यावर चहाच्या स्टॉलवर मदत करत असे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिमांशू गुप्ताला बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी दररोज 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता.
दिल्ली विद्यापीठातून केली तयारी
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमांशूनं दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तो कॉलेजची फी भरण्यासाठी शिकवणीही घेत असे. हिमांशूनं नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं आणि यासाठी त्यांनी कोचिंग क्लास न लावता घरीच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
कोचिंग क्लानविना UPSC क्रॅक
हिमांशूनं यूपीएससीच्या तयारीसाठी कोचिंगची मदत घेतली नाही. हिमांशूनं २०१८ साली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. रँकनुसार, त्यांना भारतीय रेल्वेत सेवा मिळाली. यानंतर, २०१९ मध्ये, त्यांनी UPSC उत्तीर्ण केली आणि पोलीस सेवेत रुजू झाले.
2020 मध्ये हिमांशूनं तिसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली. यात 139 वी रँक मिळाली. तिसर्यांदा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हिमांशुनं आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. एका मुलाखतीत हिमांशूनं सांगितलं की, यूपीएससीच्या तयारीसाठी त्यांनी इंटरनेटची मदत घेतली आणि डिजिटल पद्धतीनं मॉक टेस्ट दिल्या.