भाऊ सुप्रीम कोर्टात वकील, वडील यूपी पोलीस अधिकारी, आता मुलगी झाली IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:26 PM2023-05-23T20:26:34+5:302023-05-23T20:29:07+5:30
UPSC Topper Smriti Mishra: स्मृती दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत.
यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या वर्षी यूपीएससी सीएसईमध्ये 933 उमेदवारांना यश मिळाले आहे. बरेलीमध्ये सीओ पदावर असलेल्या राजकुमार मिश्रा यांची मुलगी स्मृती मिश्राने आयएएसमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. स्मृती मिश्रा हिने चौथा रँक मिळवला आहे. स्मृती दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत.
यूपीएससी टॉपर स्मृती मिश्रा हिचे वडील सीओ राजकुमार मिश्रा म्हणाले की, माझ्यासाठी यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. आज माझ्या मुलीने माझे स्वप्न साकार केले आहे. तसेच, त्यांनी सांगितले की, ते प्रयागराजमधील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा सुप्रीम कोर्टात वकील आहे.
प्रयागराज येथील रहिवासी असलेल्या स्मृती मिश्रा हिने यूपीएससीमध्ये चौथा क्रमांक मिळाला आहे. स्मृती मिश्रा यांचे वडील राजकुमार मिश्रा हे उत्तर प्रदेशातील बरेली येथे सीओ पदावर आहेत. याशिवाय, तिचे भाऊ लोकेश मिश्रा हे सुप्रीम कोर्टात वकील आहेत. तसेच, स्मृती मिश्रा हिने यूपीएससीमध्ये चौथा क्रमांक मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, यावर्षी यूपीएससी टॉपर्सच्या यादीत मुलींनी बाजी मारली आहे. ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेल्या इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. इशिताचे वडील हवाई दलात अधिकारी आहेत. इशिता किशोरशिवाय गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकावर, उमा हर्थी एन तिसऱ्या आणि स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे.
UPSC Top 10 Toppers
रँक 1- इशिता किशोर
रँक २- गरिमा लोहिया
रँक 3- उमा हर्थी एन
रँक 4- स्मृती मिश्रा
रँक 5- मयूर हजारिका
रँक 6- गेहना नवीन रत्ने
रँक 7- वसीम अहमद भट्ट
रँक 8- अनिरुद्ध यादव
रँक 9- कनिका गोयल
रँक 10- राहुल श्रीवास्कव