यूपीएससी टॉपरला अवघे ५५ टक्के मार्क्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:05 AM2018-05-07T02:05:56+5:302018-05-07T02:05:56+5:30
यंदाच्या भारतीय संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या हैदराबादच्या डुरीशेट्टी अनुदीप या टॉपरला अवघे ५५.६ टक्के मार्क मिळाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : यंदाच्या भारतीय संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या हैदराबादच्या डुरीशेट्टी अनुदीप या टॉपरला अवघे ५५.६ टक्के मार्क मिळाले आहेत.
यूपीएससीची मुख्य परीक्षा १७५0 मार्कांची आहे तर मुलाखतीसाठी २७५ पैकी गुण दिले जातात. अनुदीपला २0२५ पैकी ११२६ म्हणजे ५५.६ टक्के प्राप्त झाले आहेत. त्याची विभागणी मेन्समध्ये ९५0 व मुलाखतीत १७६ मार्क्स अशी आहे. दुसºया क्रमांकावरील अनुकुमारीला अनुदीपपेक्षा अवघे २ मार्क कमी म्हणजे ११२४ मार्क्स तर तिस-या क्रमांकावरील सचिन गुप्ताला ११२२ मार्क मिळाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या टॉपरला ११२0 माकर््स होते. सर्वसाधारण व राखीव कोट्यातल्या मार्कांचे अंतरही यंदा कमी झाले. सर्वसाधारण वर्गाचे कट आॅफ मार्क्स १00६, ओबीसीचे ९६८ तर एसीएसटीचे ९४४ होते. विशेष म्हणजे, पहिल्या २0 क्रमांकांमध्ये केवळ एक दिल्ली महानगरातला आहे, बाकी सारे छोट्या शहरातले आहेत.