हिमाचल प्रदेशात युरेनियमचा साठा; चार जिल्ह्यांत शेकडो टन आण्विक खनिज असल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 09:04 AM2024-07-29T09:04:49+5:302024-07-29T09:05:15+5:30

अणूउर्जा विभागाच्या अंतर्गत येणारी आण्विक खनिज अन्वेषण आणि संशाेधन संचालनालयाने हिमाचल प्रदेशमध्ये सर्वेक्षण केले हाेते.

Uranium reserves in Himachal Pradesh; It is estimated that there are hundreds of tons of nuclear minerals in the four districts | हिमाचल प्रदेशात युरेनियमचा साठा; चार जिल्ह्यांत शेकडो टन आण्विक खनिज असल्याचा अंदाज

हिमाचल प्रदेशात युरेनियमचा साठा; चार जिल्ह्यांत शेकडो टन आण्विक खनिज असल्याचा अंदाज

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये माेठ्या प्रमाणावर लिथियमचा साठा सापडला हाेता. आता हिमाचल प्रदेशमध्ये माेठ्या प्रमाणावर युरेनियमचा साठा आढळला आहे. हमीरपूर, उना, शिमला आणि मंडी या जिल्ह्यामध्ये सुमारे ८०० टनांपेक्षा जास्त साठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अणूउर्जा विभागाच्या अंतर्गत येणारी आण्विक खनिज अन्वेषण आणि संशाेधन संचालनालयाने हिमाचल प्रदेशमध्ये सर्वेक्षण केले हाेते.

युरेनियमचा वापर कशासाठी हाेताे?

- युरेनियम डायऑक्साईडचा वापर अणूउर्जेसाठी केला जाताे. अण्विक रिॲक्टरमध्ये युरेनियम आणि प्लुटाेनियम डायऑक्साईडच्या छड्या वापरल्या जातात. 

- भारत समृद्ध युरेनियमसाठी इतर कॅनडा, रशिया, उझबेकिस्तान इत्यादी देशांवर अवलंबून आहे. भारतात माेठा साठा आढळल्यामुळे हे अवलंबन कमी हाेईल.
 

Web Title: Uranium reserves in Himachal Pradesh; It is estimated that there are hundreds of tons of nuclear minerals in the four districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Haryanaहरयाणा