शहरी लोकांनाही बंपर नफा कमावण्याची संधी, टेरेसवरील बागायतीसाठी मिळतेय घसघशीत सब्सिडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 08:23 PM2023-03-30T20:23:44+5:302023-03-30T20:24:47+5:30
Subsidy For Rooftop Gardening: ग्रामीण भागातील लोकांसोबत आता शहरी भागातील लोकांनाही सरकार शेती-बागायतीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
ग्रामीण भागातील लोकांसोबत आता शहरी भागातील लोकांनाही सरकारशेती-बागायतीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारसरकारकडून शहरी लोकांना टेरेसवर बागायती करण्यासाठी सब्सिडी देण्यात येत आहे. आता तुम्हीही इमारतीच्या छतावर बागायती करू इच्छित असाल तर राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांच्या खर्चावर ५० टक्क्यांपर्यंत सब्सिडी दिली जात आहे. ५० हजार रुपये खर्चावर ५० टक्के सब्सिडीचं गणित पाहिल्यास लाभार्थ्यांना २५ हजार रुपये सब्सिडी मिळेल.
ही योजना पाटणा शहरातील लोकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. त्यामाध्यमातून ते स्वत:साठी शुद्ध भाज्या आणि फळे पिकवू शकतात. तसेच त्याचा व्यवसाय सुरू करून नफाही मिळवू शकतात. यासाठी इच्छुक लोक बिहार हॉर्टिकल्चर विभागाच्या http://horticulture.bihar.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
घरातील टेरेसवप पालक, बटाटे, टोमॅटो, हिरवी मिरची, पुदिना, तोरई, भेंडी यासारख्या हिरव्या भाज्या सहजपणे पिकवता येतात. या भाज्या पिशवी, ट्रे, मडक्या, कुंड्या आदींमध्ये रुजवता येतात. त्याशिवाय हायड्रोपोनिक पद्धतीनेसुद्धा त्या छतांवर रुजवता येतात. या तंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये झालं लावण्यासाठी मातीची आवश्यकता नसते. यामध्ये पाण्याच्या मदतीने भाजा आणि फळे रुजवली जातात. या तंत्राच्या मदतीने शेतकरी कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन घेऊ शकतात.