कर्करोगांसारखे आजार वाढण्यामागे शहरीकरण !

By admin | Published: August 6, 2016 04:00 AM2016-08-06T04:00:17+5:302016-08-06T04:00:17+5:30

कॅन्सर आणि मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्यामागे नागरीकरण, वायुप्रदूषण आणि जीवनशैलीतील बदल आदी घटक कारणीभूत आहेत

Urbanization of cancer, like cancer! | कर्करोगांसारखे आजार वाढण्यामागे शहरीकरण !

कर्करोगांसारखे आजार वाढण्यामागे शहरीकरण !

Next


नवी दिल्ली : कॅन्सर आणि मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्यामागे नागरीकरण, वायुप्रदूषण आणि जीवनशैलीतील बदल आदी घटक कारणीभूत आहेत, असे सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले. २०१०-२०१३ दरम्यान हृदयविकार, श्वसनविकार, कॅन्सर आणि अतिसार यामुळे सर्वाधिक मृत्यू झाले,
असे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर आणि फुप्फुसाशी संबंधित विकारांचे प्रमाण वाढत चालले असून, शहरीकरण, तंबाखूचे सेवन, शारीरिक श्रमाचा अभाव, जीवनशैलीत बदल, अयोग्य आहार, उच्च रक्तदाब आणि मद्यसेवन यासारखे अनेक घटक त्याला कारणीभूत असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.
२००४-२००६ ते २०१०-१३ दरम्यान हृदयविकार, श्वसनसंस्था आणि पचनसंस्थेच्या विकारांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले.
आताही या आजारांचा मृत्यूदरातील वाटा वाढताच असून, कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे, असे ते म्हणाले. काही सरकारी रुग्णालयांत रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची
तक्रार एका काँग्रेस सदस्याने केल्यानंतर नड्डा म्हणाले की, केंद्र सरकार आरोग्य सुविधांसाठी तळागाळापर्यंत वित्तीय आणि तांत्रिक साहाय्य पुरविते.
तथापि, कार्यक्रमांची अंमलबजावणी हा सर्वस्वी राज्य सरकारांचा विषय आहे. निधीचा योग्य वापर होईल याची खबरदारी
घेतली जावी, असे केंद्राला वाटते. त्यामुळेच संबंधित संसद सदस्यांना याबाबत निगराणीचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या तुटवड्याबाबत
तृणमूल काँग्रेसच्या सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना
नड्डा म्हणाले की, डॉक्टरांची
नेमणूक करणे हा राज्य सरकारांचा विषय आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>उद्योग क्षेत्रातून मिळाले ७.५ कोटी अर्थसाह्य
सीएसआर उपक्रमांतर्गत आरोग्य सुविधांसाठी अर्थसाहाय्य पुरवू इच्छिणाऱ्या उद्योगांसाठी हेल्थ मिनिस्टर्स कॅन्सर पेशन्ट फंड-कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलिटी अकाउंट ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ दरम्यान आतापर्यंत उद्योग क्षेत्रातून ७.५ कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Urbanization of cancer, like cancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.