शायर, गीतकार राहत इंदौरी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 06:44 AM2020-08-12T06:44:59+5:302020-08-12T06:46:39+5:30

हळव्या कोपऱ्यातील जखमा उलगडणारी लेखणी शांत

Urdu Poet Rahat Indori Undergoing COVID Treatment Dies Of Heart Attack | शायर, गीतकार राहत इंदौरी यांचे निधन

शायर, गीतकार राहत इंदौरी यांचे निधन

googlenewsNext

इंदोर : आपली उर्दू व हिंदी शायरी आणि कविता यांतून अत्यंत हळव्या व संवेदनशील भावना मांडतानाच प्रसंगी सामाजिक व राजकीय दांभिकतेवर कोरडे ओढणारे प्रख्यात शायर राहत इंदौरी (वय ७०) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना सोमवारी येथील अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राहत इंदोरी यांच्याशी निधनाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या शायरीवर प्रेम करणारे लाखो रसिकही शोक व्यक्त करीत आहेत. इंदोरी यांचा दफनविधी बुधवारी सकाळी होणार आहे.

Web Title: Urdu Poet Rahat Indori Undergoing COVID Treatment Dies Of Heart Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.