उर्जित पटेल पुन्हा संसदीय समितीपुढे

By admin | Published: March 24, 2017 12:31 AM2017-03-24T00:31:58+5:302017-03-24T00:31:58+5:30

वित्त विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या २० एप्रिलच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना पुन्हा बोलावले जाण्याची शक्यता आहे.

Urjit Patel again to the Parliamentary Committee | उर्जित पटेल पुन्हा संसदीय समितीपुढे

उर्जित पटेल पुन्हा संसदीय समितीपुढे

Next

नवी दिल्ली : वित्त विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या २० एप्रिलच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना पुन्हा बोलावले जाण्याची शक्यता आहे.
वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील समिती एक हजार रुपये व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारी निर्णयाची छाननी करत आहे. या बैठकीत पटेल, वित्तीय बाबींचे सचिव शक्तिकांत दास व वित्तीय सेवा सचिव अंजली चिब दुग्गल यांना बोलावले जाण्याची शक्यता आहे.
याआधी समितीपुढे पटेल यांनी सरकारने नोटाबंदीची सूचना केली व दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेने त्यास संमती दिली असे सांगितले होते. मात्र किती बाद नोटा बँकांत जमा झाल्या याची माहिती ते देऊ शकले नव्हते. आता ती माहिती घेतली जाईल व नव्या नोटा आणल्याने स्थिती किती सुधारली, याचा आढावा घेतला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Urjit Patel again to the Parliamentary Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.