CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:51 PM2020-06-16T12:51:53+5:302020-06-16T12:52:11+5:30

CoronaVirus News: भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांनी १०० व्हेंटिलेटरची पहिली खेप भारताकडे सोपवली आहे.

us ambassador to india ken juster hands over the first lot of 100 ventilators | CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

Next

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवलेला आहे. अनेक देशांना अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. तर काही देश कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूवर लस बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री, उपराज्यपाल आणि देशातील उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे या संकटाच्या काळातही अमेरिका दिलेल्या शब्दाला जागला आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांनी १०० व्हेंटिलेटरची पहिली खेप भारताकडे सोपवली आहे.

कोरोना विषाणूच्या साथीचा हा रोग आपल्या सर्वांसाठी एक मोठं जागतिक आरोग्य संकट आहे. पण या संकटातही भागीदारी आणि सहकार्यातून आपण जनतेचे निरोगी भविष्य घडवू शकतो, असंही भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर म्हणाले आहेत. अमेरिकन सरकारच्या सहकार्यानं एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून भारतीय लोकांना २०० व्हेंटिलेटर्स देणार आहोत आणि आज आम्ही भारतीय रेडक्रॉसकडे १०० व्हेंटिलेटरची पहिली खेप हस्तांतरित केली आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे, असंही ते म्हणाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूमुळे 380 लोक मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू 178 आहेत. दिल्लीत 73, तामिळनाडूमध्ये 44, गुजरातमध्ये 28, हरियाणामध्ये 12, पश्चिम बंगालमध्ये 10, राजस्थानात 9, मध्य प्रदेशात 6, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये 4-4 मृत्यू आहेत.  जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी 3, तेलंगणामध्ये 2 आणि बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: us ambassador to india ken juster hands over the first lot of 100 ventilators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.