Corona Vaccination: कोरोना लसीकरणासाठी अमेरिकेकडून 2.5 कोटी डॉलरची मदत जाहीर; ब्लिंकननी घेतली मोदींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:31 PM2021-07-28T22:31:52+5:302021-07-28T22:32:53+5:30
Antony blinken tour on India; corona Vaccination help: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले. अमेरिका आणि भारताचे सहकार्य लोकशाही मुल्यांना आकार देत आहे आणि जगाच्या भल्यासाठी एक ताकद असल्याचे म्हटले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन (Antony blinken) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी भारत-अमेरिकेदरम्यान सहकार्य मजबूत करण्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तत्पूर्वी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(S Jayshankar) यांची भेट घेतली. यावेळी ब्लिंकन यांनी भारताला कोरोना लसीसाठी 2.5 कोटी डॉलरची मदत देण्याची घोषणा केली. (US State secretory Antony blinken annonced help of 2.5 crore dollar for corona Vaccination in India.)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले. अमेरिका आणि भारताचे सहकार्य लोकशाही मुल्यांना आकार देत आहे आणि जगाच्या भल्यासाठी एक ताकद असल्याचे म्हटले.
US Secretary of State Antony Blinken called on PM Narendra Modi earlier today. He briefed PM on his fruitful exchanges with EAM & NSA earlier in the day & expressed strong commitment to further deepen India US strategic relations in various sectors: Ministry of External Affairs pic.twitter.com/ETpD27g2zV
— ANI (@ANI) July 28, 2021
ब्लिंकन हे मंगळवारी सायंकाळी भारतात आले आहेत. ते अन्य नेत्यांनाही भेटणार आहेत. आज त्यांनी दलाई लामांच्या प्रतिनिधीचीही भेट घेतली.
Today, I'm proud to announce an additional $25 million from the U.S. government, through @USAID, to support India’s COVID-19 vaccination program. The United States’ support will help save lives by strengthening vaccine supply chains across India. pic.twitter.com/In45qnrgID
— Secretary Antony Blinken (@SecBlinken) July 28, 2021
एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ब्लिंकन यांनी अमेरिका कोरोना लसीकरणासाठी भारताला 2.5 कोटी डॉलरची मदत करणार असल्याची घोषणा केली. अमेरिकेने भारताला आधीच 2 कोटी डॉलरहून अधिक रकमेची कोरोना मदत दिली आहे. अमेरिका सरकार भारतातील लसीकरण मोहिमेला मदत करणार आहे. भारत आणि अमेरिकेतून कोरोना महामारी संपविण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही एकत्र काम करत राहू, असे ब्लिंकन म्हणाले.