बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन चौथं विमान दिल्लीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 00:00 IST2025-02-24T00:00:04+5:302025-02-24T00:00:18+5:30
US Deports Indian Migrants: अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन चौथं विमान रविवारी भारतात दाखल झालं. हे सर्व प्रवासी लाखो रुपये खर्च करून जीव धोक्यात घालून डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत घुसले होते.

बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन चौथं विमान दिल्लीत दाखल
अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन चौथं विमान रविवारी भारतात दाखल झालं. हे सर्व प्रवासी लाखो रुपये खर्च करून जीव धोक्यात घालून डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत घुसले होते. दरम्यान, अमेरिकन एअरफोर्सच्या विशेष विमानाने या प्रवाशांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानामधील प्रवाशांपैकी चार प्रवासी हे पंजाबमधील होते. त्यातील दोघेजण गुरदासपूर येथील तर पतियाळा आणि जालंधर येथील प्रत्येकी एक प्रवासी होता. त्यांना आपापल्या घरी पाठवण्यात आले आहे.
डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅडामध्ये स्थायिक होण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये पंजाबमधील लोकांचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. त्यानंतर या प्रवाशांमध्ये गुजरातमधील लोकांचा नंबर लागतो. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबला बदनाम करण्यासाठी या बेकायदेशीर प्रवाशांना घेऊन येणारं विमान पंजाबमध्ये उतरवण्यात आलं, असा दावा केला होता. अमेरिकेतून बेकायदेशीर प्रवाशांना घेऊन येणारी विमानं अन्य राज्यात उतरवली पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.