'डोवाल आंतरराष्ट्रीय खजिना', अमेरिकेच्या राजदूताने भारताच्या NSAचे केले कौतुक; म्हणाले, दोन्ही देशांचा पाया ....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 11:47 AM2023-06-14T11:47:57+5:302023-06-14T11:49:34+5:30
अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताचे NSA अजित डोवाल यांचे कौतुक केले.
भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कौतुक केले आहे. आज नवी दिल्लीत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री तर्फे आयोजित कार्यक्रमात अमेरिकेचे राजदूत सहभागी झाले होते.यावेळी त्यांनी कौतुक केले.
अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी म्हणाले, उत्तराखंडमधील एका गावातील डोवाल हे फक्त राष्ट्रीय खजिनाच नाहीत तर आंतरराष्ट्रीय खजिना बनले आहेत. आज जेव्हा मी अमेरिका आणि भारत यांच्यातील पाया पाहतो तेव्हा तो खूप मजबूत आहे. भारतातील लोक अमेरिकनांवर प्रेम करतात आणि अमेरिकेतील लोक भारतीयांवर प्रेम करतात हे स्पष्ट आहे.
ब्यूटी विद ब्रेन! Miss India होण्याचं स्वप्न सोडून 'तिने' वेगळी वाट निवडली, पास झाली UPSC
अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी हे भारताच्या डिजिटल क्रांतीचे चाहते आहेत. दिल्ली येथे झालेल्या युनायटेड स्टेट्स-इंडिया इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज बैठकीत त्यांनी डिजिटल पेमेंट आणि आर्थिक तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले. एका कार्यक्रमात बोलताना एरिक म्हणाला की, जेव्हा मी भारतात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक तंत्रज्ञान पाहतो तेव्हा मला विश्वास आहे की आम्ही जगाला हेवा वाटत असेल. गावातील चहा विकणाराही थेट सरकारकडून त्याच्या फोनमध्ये पैसे घेतो, त्यालाही संपूर्ण पैशाच्या १००% पैसे मिळतात.
एरिक गार्सेटी म्हणाले की, नुकतेच मी भारतातील अनेक धर्मांच्या नेत्यांसोबत जेवण केले, त्यापैकी एक म्हणाले की आम्ही 4G, 5G आणि 6G बद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत, पण इथे भारतात यापेक्षा अधिक शक्तिशाली काहीतरी आहे. आम्ही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची वाट पाहत आहोत. पीएम मोदी २२ जूनला वॉशिंग्टनला भेट देणार आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन, दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत, त्यांनी मंगळवारी त्यांचे भारतीय समकक्ष अजित डोवाल यांची भेट घेतली आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या हिताची चर्चा केली.