अमेरिकेच्या अफगाणमधील उपकरणांचा काश्मिरात अतिरेक्यांकडून वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:44 AM2022-04-18T10:44:29+5:302022-04-18T10:45:55+5:30

लष्कराला वायफायद्वारे जाेडता येणारी थर्मल इमेजरी उपकरणे तसेच इरिडियम सॅटेलाईट फाेनचा वापर काश्मीरमध्ये हाेत आहे. लष्कराने असे १५ संकेत पकडले आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांपासून दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी या थर्मल इमेजरी उपकरणांचा वापर हाेताे.

US equipment in Afghan used by militants in Kashmir | अमेरिकेच्या अफगाणमधील उपकरणांचा काश्मिरात अतिरेक्यांकडून वापर

अमेरिकेच्या अफगाणमधील उपकरणांचा काश्मिरात अतिरेक्यांकडून वापर

Next

श्रीनगर : अमेरिका व मित्रराष्ट्रांच्या सैन्याकडून अफगाणिस्तानात साेडून दिलेली अत्याधुनिक उपकरणे काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या हाती लागली आहेत. अत्याधुनिक इरिडियम सॅटेलाईट फाेन तसेच रात्रीच्यावेळी सुरक्षा यंत्रणांना चकविण्यात मदत करणाऱ्या उपकरणांचा दहशतवाद्यांकडून वापर हाेत असल्याचे आढळून आले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांच्या वापरावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

लष्कराला वायफायद्वारे जाेडता येणारी थर्मल इमेजरी उपकरणे तसेच इरिडियम सॅटेलाईट फाेनचा वापर काश्मीरमध्ये हाेत आहे. लष्कराने असे १५ संकेत पकडले आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांपासून दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी या थर्मल इमेजरी उपकरणांचा वापर हाेताे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यापासून अशा उपकरणांचा वापर हाेत असल्याचे संकेत मिळायला लागले. सुरुवातीला उत्तर काश्मीरमध्ये संकेत मिळाले हाेते. आता ते दक्षिण काश्मीरमध्येही मिळत आहेत. जवानांच्या शरीरातून उत्पन्न हाेणाऱ्या उष्णतेला थर्मल इमेजरी उपकरणे पकडतात आणि जवानांची माहिती दहशतवाद्यांना प्राप्त हाेते.

उपकरणांचा शाेध सुरू
इरिडियम सॅटेलाईट फाेन व इतर उपकरणांना शाेधण्यात येत आहे. यासाठी संरक्षण गुप्तचर विभाग व राष्ट्रीय तांत्रिक संशाेधन संस्थेसारख्या संस्थांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या २६/११च्या हल्ल्यानंतर या उपकरणांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तानातून काश्मीरमध्ये पुरवठा
अशाप्रकारची उपकरणे पाकिस्तानी लष्कराकडे नाहीत. अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यापूर्वी बरेच लष्करी साहित्य तेथेच टाकून दिले हाेते. ते तालिबान्यांच्या हाती पडले आणि तेथून ते काश्मीरमधील दहशतवाद्यांना पुरविण्यात आल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: US equipment in Afghan used by militants in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.