दहशतवादावरुन अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावलं

By admin | Published: August 31, 2016 01:15 PM2016-08-31T13:15:21+5:302016-08-31T13:15:21+5:30

भारत दौ-यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दहशतवाद्याच्या मुद्यावरुन पाकिस्तानला खडसावलं आहे

The US once again repelled Pakistan from terrorism | दहशतवादावरुन अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावलं

दहशतवादावरुन अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावलं

Next
- ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 31 - भारत दौ-यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दहशतवाद्याच्या मुद्यावरुन पाकिस्तानला खडसावलं आहे. 'पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यांच्यासोबत इसीस आणि अल कायदा जगासाठी सर्वात मोठा धोका आहे', असं जॉन केरी बोलले आहेत. आयआयटी दिल्लीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.
 
'अमेरिका आणि भारत दोन्ही देशांनी दहशतवादामुळे होणा-या नुकसानाचं दुख: सोसलं आहे. पाकिस्तानने दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज असल्याचं', सांगत जॉन केरी यांनी पाकिस्तानला खडसावलं. मुंबई आणि पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी अमेरिका पुर्णपणे समर्थन करणार असल्याच्या आपल्या वक्तव्यावर बोलताना जॉन केरी यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्दयावरुन सुनावलं.
 
'दहशतवादाशी संबंधित संघटनांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला कठोर मेहनत करणं गरजेचं आहे हे स्पष्ट आहे', असं जॉन केरी बोलले आहेत. जॉन केरी यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय देत पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुकही केलं. 'पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शरिफ यांना निमंत्रण दिल्याबद्दल नरेंद्र मोदींच कौतुक केलं पाहिजे', असं जॉन केरी बोलले आहेत. सोबतच दहशतवादाच्या मुद्यावर अमेरिका नेहमी भारताच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल याची हमी दिली आहे.
 
'कोणताही देश एकटा दहशतवादाशी लढा देऊ शकत नाही. सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणं गरजेचं आहे. सुरक्षेला धोका हा सर्वात मोठा धोका असतो. आम्ही दोन्ही देशांनी दहशतावादाचं दुख: सोसलं आहे', असं जॉन केरी बोलले आहेत.
 

Web Title: The US once again repelled Pakistan from terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.