मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 07:47 AM2020-07-05T07:47:15+5:302020-07-05T07:48:06+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं आहे. अनेक देश कोरोनाला थोपवण्यासाठी लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काही देशांनी कोरोनावर औषधही शोधून काढण्याला दावा केला आहे. या संकटाच्या परिस्थितीत अनेक देश एकत्र आले आहेत. भारत आणि अमेरिकेची मैत्रीसुद्धा मागील काही दिवसांपासून वृद्धिंगत होत गेली आहे.
अमेरिका आपला 244वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याला उत्तर देत डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे आभार मानले. पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशाला उत्तर देताना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी लिहिले, 'धन्यवाद माझ्या मित्रा. अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे! '
I congratulate @POTUS@realDonaldTrump and the people of the USA on the 244th Independence Day of the USA. As the world's largest democracies, we cherish freedom and human enterprise that this day celebrates. @WhiteHouse
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2020
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिले आहे की, “मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या 244व्या स्वातंत्र्य दिनाच्या तिथल्या नागरिकांना शुभेच्छा देतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण स्वातंत्र्य आणि मानवी उपक्रमांना नेहमीच महत्त्व देता, या मूल्यांची आम्ही कदर करतो.