USचा स्टूडंट व्हिसा आहे, पण प्लॅन बदलला तर काय करायचं?
By admin | Published: June 12, 2017 11:18 AM2017-06-12T11:18:41+5:302017-06-12T11:21:07+5:30
तुम्ही अमेरिकेत स्टूडंट व्हिसावर प्रथमच जात असाल, तर तुम्हाला नवीन स्टूडंट व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.
Next
>प्रश्न - माझ्याकडे स्टूडंट व्हिसा आहे. पण माझा प्लॅन बदलतोय. मला दुसऱ्या विद्यापीठामध्ये अॅडमिशन मिळालीय. मी आहे त्याच व्हिसावर जाऊ शकतो का नवा व्हिसा लागेल?
उत्तर - तुम्ही अमेरिकेत स्टूडंट व्हिसावर प्रथमच जात असाल, तर तुम्हाला नवीन स्टूडंट व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. नवीन शैक्षणिक संस्था तुम्हाला फॉर्म I-20 नव्याने देईल, ज्यामध्ये वेगळा SEVIS क्रमांक असेल. स्टूडंट व्हिसावर अमेरिकेत प्रथमच जाताना स्टूडंट व्हिसावरील SEVIS क्रमांक I-20 फॉर्मवरील क्रमांकाशी जुळावा लागतो.
परंतु, तुम्ही याआधी अमेरिकेमध्ये स्टूडंट व्हिसावर प्रवेश केला आहे आणि आता परत जात आहात, तर जोपर्यंत स्टूडंट व्हिसा वैध आहे तोपर्यंत I-20 फॉर्मवर वेगळा SEVIS क्रमांक असला तरी चालतो. असं असलं तरी, जर अमेरिकेत 5 महिन्यांच्या अंतराने परत येत असाल, तर तुम्ही नवीन व्हिसासाठी अर्ज करावा असा आमचा सल्ला आहे.
स्टूडंट व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अर्ज केलेल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांकडून उत्तर येण्याची वाट बघणं श्रेयस्कर आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक संस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यावर मन बदलून व्हिसासाठी पुन्हा अर्ज करण्याचा त्रास वाचेल.
आणखी वाचा...