US Visa - वैद्यकीय अहवालाची मुदत संपली तर काय करायचं?

By admin | Published: July 10, 2017 01:00 PM2017-07-10T13:00:19+5:302017-07-10T13:00:19+5:30

माझा अमेरिकेचा इमिग्रंट व्हिसा मंजूर झाला आहे, पण मी अमेरिकेला जाण्याआधी माझ्या वैद्यकीय अहवालाची मुदत संपणार आहे, तरीही मी अमेरिकेला जाऊ शकतो का?

US Visa - What to do if the medical report expires? | US Visa - वैद्यकीय अहवालाची मुदत संपली तर काय करायचं?

US Visa - वैद्यकीय अहवालाची मुदत संपली तर काय करायचं?

Next
प्रश्न - माझा अमेरिकेचा इमिग्रंट व्हिसा मंजूर झाला आहे, पण मी अमेरिकेला जाण्याआधी माझ्या वैद्यकीय अहवालाची मुदत संपणार आहे, तरीही मी अमेरिकेला जाऊ शकतो का ? 
उत्तर - वैद्यकीय अहवालाची मुदत संपल्यानंतर तुम्हाला जो व्हिसा मंजूर झालाय त्यावर तुम्ही प्रवास करु शकत नाही. तुम्हाला पुन्हा नव्याने वैद्यकीय तपासणी करुन नव्याने व्हिसा मिळवावा लागेल. इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेला जाण्यासाठी तुमच्याकडे वैध वैद्यकीय अहवाल असला पाहिजे. वैद्यकीय अहवाल त्याच्या तारखेपासून  फक्त सहा महिनेच ग्राहय धरला जातो. वैद्यकीय अहवालाची मुदत संपते त्याच दिवशी तुमचा व्हिसाही संपतो. 
 
 
तुम्हाला मुदतीमध्ये इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेचा प्रवास करता आला नाही. त्यानंतर तुम्हाला पुन्हा अमेरिकेला जायचे असेल तर, तुम्हाला नव्याने तुमची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी लागेल. कागदपत्रांमध्ये आवश्यक बदल करावे लागतील आणि ustraveldocs.com या संकेतस्थळावरुन पुन्हा मुलाखतीची वेळ घ्यावी लागेल. तुम्हाला पहिल्यांदा मंजूर झालेल्या इमिग्रंट व्हिसावर का प्रवास करता आला नाही ते, दूतावासातील अधिका-याला पटवून द्यावे लागेल, तुमची बाजू पटली तर तुम्हाला नवीन व्हिसा मंजूर केला जाईल. 
 
आणखी वाचा 
 
65 वर्षांच्या आजीला व्हिसासाठी मुलाखत द्यावी लागेल का?
कसा मिळवायचा अमेरिकेचा व्हिसा?
अमेरिकी नागरिकाशी लग्न केल्यावर व्हिसाचं काय?
USचा स्टूडंट व्हिसा आहे, पण प्लॅन बदलला तर काय करायचं?
माझी मुलाखतीची तारीख बदलता येईल का?
US व्हिसा मुलाखतीच्या आधी बोटाचे ठसे घेतात का?

 

Web Title: US Visa - What to do if the medical report expires?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.