दहशतवादाविरुद्ध सैन्यच वापरा

By admin | Published: September 21, 2016 07:45 AM2016-09-21T07:45:33+5:302016-09-21T07:45:33+5:30

नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनासाठी आले असून, तिथे भारतीय पत्रकाराने उरी हल्ल्याचा प्रश्न त्यांना विचारताच, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले

Use an army against terrorism | दहशतवादाविरुद्ध सैन्यच वापरा

दहशतवादाविरुद्ध सैन्यच वापरा

Next

नवी दिल्ली- नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनासाठी आले असून, तिथे भारतीय पत्रकाराने उरी हल्ल्याचा प्रश्न त्यांना विचारताच, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षा रक्षकाने त्या पत्रकाराला बाजूला ढकलले. 2जगातील बहुसंख्य देशांनी उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे. जर्मनी, जपान, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतानाच, दहशतवादाचा बिमोड करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आमची साथ मिळेल, असे आश्‍वासन दिले आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून, या हल्ल्याचा निषेध केला. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपला सिरीसेना यांनीही पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली आणि या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली, तसेच हल्ल्याचा निषेध केला. 1पाकिस्तानने पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवादी गटांना अतिरिक्त पाऊले उचलून हाताळावे यासाठी आम्ही त्याच्याकडे सतत आग्रह धरत राहू, असे अमेरिकेने म्हटले आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न सोडविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेकडे मदत मागितल्यानंतर लगेचच अमेरिकेने ही भूमिका स्पष्ट केली. शरीफ यांनी सोमवारी येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांची भेट घेऊन काश्मीरमध्ये होत असलेले कथित मानवी हक्कांचे उल्लंघन आणि हत्या यांचा प्रश्न उपस्थित केला. 'दहशतवादी गटांवर कारवाईचा पाककडे आग्रह' नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध सैन्य बळाचा वापर करावा, अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणाबाबत नागरिकांतून नकारात्मक मत व्यक्त होत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
पाचपैकी तीन म्हणजेच ६२ टक्के नागरिकांचे मत आहे की, आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध आता सैन्य बळाचा वापर करायला हवा, तर संरक्षण क्षेत्रावर होणार्‍या खर्चाबाबत मात्र ६३ टक्के नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे; पण सैन्य बळाच्या वापरातून द्वेष निर्माण होऊ शकतो, असे मत २१ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. दिल्लीत जवळपास अडीच हजार नागरिक आणि १५ राज्यांतील नागरिकांचे मत यातून जाणून घेण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६८ टक्के नागरिकांचे हे मत आहे की, जगात आज भारत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा लाभ मिळत आहे; पण मोदी यांचे पाकिस्तानबाबतचे जे धोरण आहे त्याबाबत मात्र यातील अध्र्या नागरिकांनी असहमती दर्शविली, तर शेजारी राष्ट्रांबाबत सरकार राबवीत असलेल्या धोरणाबाबत २२ टक्के नागरिकांनी सहमती दर्शविली आहे.
पाकशी संबंध ठेवण्याबाबतची पंतप्रधानांची भूमिका भाजपच्या ५४ टक्के सर्मथकांनी आणि काँग्रेसच्या ४५ टक्के सर्मथकांनी नाकारली आहे. उरी हल्ल्यानंतर देशात संताप असून, सैन्य कारवाईबाबत पंतप्रधान मोदी यांना आग्रह केला जात आहे, अशा काळात हा अहवाल आला आहे. दरम्यान, चीनसोबतच्या संबंधांबाबत मात्र, काँग्रेस सर्मथकांच्या तुलनेत भाजपच्या अनेक सर्मथकांनी मोदी यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Use an army against terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.