दाऊदला आणण्यासाठी 'साम-दाम-दंड-भेदा'चा वापर करू - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2015 09:57 AM2015-09-07T09:57:00+5:302015-09-07T12:36:37+5:30

मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी सरकार 'साम,दाम,दंड, भेद'अशा सर्व उपायांचा वापर करेल असे राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले.

To use Dawood, you should use 'Sam-bam-Pandhheda' - Rathod | दाऊदला आणण्यासाठी 'साम-दाम-दंड-भेदा'चा वापर करू - राठोड

दाऊदला आणण्यासाठी 'साम-दाम-दंड-भेदा'चा वापर करू - राठोड

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.७ - मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्यासाठी सरकार 'साम,दाम,दंड, भेद' अशा सर्व उपायांचा अवलंब करेल, असे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले. भारताचा शत्रू असलेला दाऊदला जेरबंद करण्यासाठी छुप्या प्रयत्नांची शक्यताही नाकारता येत नसल्याचेही राठोड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. 
'गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये वास्तव्य करणा-या दाऊदला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. भारताचे शत्रू कोठेही असले तरी आमचं त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं, ते कोठेही शांतपणे जगू शकणार नाहीत' असे राठोड म्हणाले. ' मात्र आम्ही ( सरकार) शत्रूंवर काय कारवाई करू हे मीडियाला सांगण्यासारखे नाही, ती कारवाई पूर्ण झाल्यानंतर कदाचित तुम्हाला त्याची माहिती देण्यात येईल. भारताविरुद्ध शत्रूत्व घेणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यास हे सरकार कटीबद्ध असल्याचे पुनरुच्चार राठोड यांनी केला.

Web Title: To use Dawood, you should use 'Sam-bam-Pandhheda' - Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.