न्यायालयांत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा

By admin | Published: March 13, 2016 03:56 AM2016-03-13T03:56:09+5:302016-03-13T03:56:09+5:30

देशातील प्रलंबित खटल्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी न्यायालयांनी वार्षिक बुलेटीन काढून त्यांच्याद्वारे सुनावणी होणाऱ्या सर्वात जुन्या प्रकरणांची माहिती द्यावी

Use digital technology in the courts | न्यायालयांत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा

न्यायालयांत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा

Next

पाटणा : देशातील प्रलंबित खटल्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी न्यायालयांनी वार्षिक बुलेटीन काढून त्यांच्याद्वारे सुनावणी होणाऱ्या सर्वात जुन्या प्रकरणांची माहिती द्यावी, अशी अभिनव कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे मांडली.
पाटणा उच्च न्यायालयाच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. बार, पीठे आणि न्यायालयांना त्यांच्या कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ‘टेक्नोसॅव्ही’ होण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
ते म्हणाले, माझ्या मनात आताच आलेला एक विचार मला तुमच्यापुढे मांडायचा आहे. आमच्या न्यायालयांनी दरवर्षी एक बुलेटीन काढले पाहिजे. त्यात त्यांनी जुन्या प्रलंबित प्रकरणांची माहिती द्यावी. काही खटले ४० किंवा ५० वर्षांपूर्वीचेही असू शकतात. त्यामुळे न्यायालयात प्रलंबित खटल्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि तुंबलेल्या असंख्य खटल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने एक वातावरण निर्माण होऊ शकेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Use digital technology in the courts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.