गॅस रेग्युलेटरचा गैरवापर घातक चिंताजनक : आता ऑनलाईनही रेग्युलेटर
By Admin | Published: August 10, 2016 11:22 PM2016-08-10T23:22:09+5:302016-08-10T23:22:09+5:30
जळगाव : खुल्या बाजारासह ऑन लाईनवरदेखील गॅस रेग्युलेटर मिळू लागल्याने ते घातक ठरू पाहत आहे. बाजारात मिळणारे हे रेग्युलेटर धोकेदायक असण्यासह त्यामुळे गॅसचा वापर वाढून अप्रत्यक्षरीत्या विक्री प्रणालीवरदेखील परिणाम होतो.
ज गाव : खुल्या बाजारासह ऑन लाईनवरदेखील गॅस रेग्युलेटर मिळू लागल्याने ते घातक ठरू पाहत आहे. बाजारात मिळणारे हे रेग्युलेटर धोकेदायक असण्यासह त्यामुळे गॅसचा वापर वाढून अप्रत्यक्षरीत्या विक्री प्रणालीवरदेखील परिणाम होतो. ज्या व्यक्तीकडे एक गॅस कनेक्शन आहे व त्याचे दोन सिल्िंाडर आहे, असे अनेकजण आपले दुसरे सिल्िंाडर भाडेकरुंसह इतरांनाही देतात. त्यासाठी बाजारातून रेग्युलेटर घेतले जाते. त्याची काही शाश्वती नसते. त्यामुळे त्यापासून अपघात होण्याची जास्त शक्यता असते. तसेच त्याबाबत अपघाताचा दावा (क्लेम) करून विम्याचाही फायदा होत नाही. सिल्िंाडरचा वापर वाढतो....बनावट रेग्युलेटरमुळे नोंदणी नसलेले ग्राहक तयार होतात. त्यामुळे सिल्िंाडरचा वापर वाढून अप्रत्यक्षरीत्या गॅस कंपनी व ग्राहकांनाही त्याचा फटका बसतो. ऑन लाईन रेग्युलेटर....आता तर ऑन लाईनवरदेखील गॅस रेग्युलेटर मिळू लागल्याने गॅस एजन्सी धारकांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली. ----खुल्या बाजारात मिळणार्या रेग्युलेटरमुळे धोका निर्माण होतो. या गैरवापरामुळे अनेक ग्राहक तयार होतात. मात्र त्यांची नोंद नसल्याने त्यांना अपघात झाल्यास काहीच फायदा होत नाही. अशा प्रकारच्या रेग्युलेटरचा वापर टाळला पाहिजे. - अजय ठोंबरे, व्यवस्थापक, गॅस एजन्सी