जिल्हा परिषद निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगारांचे मनुष्यबळ वापरावे : भारिप बहुजन महासंघाची मागणी

By admin | Published: January 10, 2017 02:17 AM2017-01-10T02:17:38+5:302017-01-10T02:17:38+5:30

कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मनुष्यबळासाठी सुशिक्षित बेरोजगारांना स्थान द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

Use of human resource for educated unemployed in Zilla Parishad election: Bharip Bahujan Mahasangh's demand | जिल्हा परिषद निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगारांचे मनुष्यबळ वापरावे : भारिप बहुजन महासंघाची मागणी

जिल्हा परिषद निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगारांचे मनुष्यबळ वापरावे : भारिप बहुजन महासंघाची मागणी

Next
ल्हापूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मनुष्यबळासाठी सुशिक्षित बेरोजगारांना स्थान द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी शिक्षकांचा वापर केला जातो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर परिणाम होऊन शालेय विद्यार्थ्यांना याची झळ पोहोचते. त्यामुळे यावेळी शिक्षकांऐवजी कोल्हापुरातील सुशिक्षित बेरोजगारांना निवडणुकीच्या काळात कंत्राटी पद्धतीने रोजगाराचे काम द्यावे. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्यात ऊर्जा निर्माण होइल. इथून पुढील काळात शासनाने कोणत्याही प्रक्रियेमध्ये शिक्षकांऐवजी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचा निवेदनात समावेश आहे.
शिष्टमंडळात शहराध्यक्ष संजय गुदगे, प्रशांत वाघमारे, संभाजी कागलकर, सिद्धार्थ आलदक˜ी, बाळासाो कांबळे, प्रशांत वाघमारे, रंगराव कांबळे, धनपाल कांबळे, केरबा तराळ, राजू कांबळे आदींचा समावेश होता.
-----------------------------
(बातमीदार : प्रवीण देसाई)

Web Title: Use of human resource for educated unemployed in Zilla Parishad election: Bharip Bahujan Mahasangh's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.