महिलांबाबत ‘हे’ सभ्य शब्द वापरा; सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केली पुस्तिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:40 AM2023-08-17T05:40:05+5:302023-08-17T05:43:08+5:30
ही पुस्तिका तयार करण्याकरिता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढाकार घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लिंग (जेंडर)विषयी वापरल्या जाणाऱ्या अयोग्य संज्ञांऐवजी अचूक संज्ञा विषद करणारी पुस्तिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रसिद्ध केली. कायदेविषयक कामकाजात लिंगविषयक चुकीच्या संज्ञा वापरल्या जाऊ नयेत यासाठी ही पुस्तिका तयार करण्याकरिता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढाकार घेतला.
वर्षभरापासून काम
अशी पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा यंदाच्या वर्षी महिला दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आली होती. मात्र या पुस्तिकेच्या लेखनासाठी अचूक शब्दनिवडीचे काम काही वर्षांपासून सुरू होते. ‘हँडबुक ऑन कॉम्बेटिंग जेंडर स्टिरियोटाइप्स’ या पुस्तिकेत २४ शब्द तसेच त्यांच्या अयोग्य व योग्य संज्ञा
अयोग्य संज्ञा - योग्य संज्ञा
- अडल्टरेस : विवाहबाह्य शारीरिक संबंध राखणारी महिला
- अफेअर : विवाहबाह्य संबंध
- बायोलॉजिकल सेक्स/बायोलॉजिकल मेल/बायोलॉजिकल फिमेल : जन्मजात लिंग (सेक्स)बॉर्न ए गर्ल/बॉय - जन्मजात स्त्री किंवा पुरुष असणे
- करिअर वुमन : वुमन
- कार्नल इंटरकोर्स : लैंगिक संभोग
- चेस्ट वूमन : महिला
- चाइल्ड प्रॉस्टिट्यूट : मानवी तस्करी करण्यात आलेले बालक
- कॉन्क्यबाइन/कीप : पुरुष जिच्याशी विवाहबाह्य प्रेमसंबंध किंवा शारीरिक संबंध राखतो ती स्त्री
- ड्युटीफूल वाईफ /फेथफुल वाईफ/गुड वाईफ/ओबेडियन्ट वाईफ : पत्नी
- इझी व्हर्च्यु (इझी व्हर्च्यु असलेली महिला) : महिला
- इफेमिनट (हा शब्द तिरस्काराच्या भावाने वापरला जातो तेव्हा) : लिंगतटस्थ शब्द वापरून वैशिष्ट्याचे अचूक वर्णन करणारी संज्ञा (उदाहरणार्थ - आत्मविश्वास असलेला, जबाबदार)
- इव्ह टिझिंग : रस्त्यावर होणारा लैंगिक छळ
- फॅगॉट : व्यक्तींच्या लैंगिक प्रवृत्तीचे केलेले अचूक वर्णन (उदाहरणार्थ - होमोसेक्शुअल, बायसेक्शुअल)
- फॉलन वूमन : महिला
- फेमिनाईन हायजिन प्रॉडक्टस् : मेनस्ट्रुअल प्रॉडक्ट्स
- फोर्सिबल रेप : बलात्कार
- हर्लोट : महिला
- हेर्माफ्रोडाइट : इंटरसेक्स
- हूकर : सेक्स वर्कर
- हार्मोनल (महिलेची भावनिक स्थिती वर्णन करताना वापरलेला शब्द) : भावनिक स्थितीचे वर्णन करण्यासाठी लिंगतटस्थ शब्द वापरा (उदाहरणार्थ - कॉम्पनसेट, एन्थुझियास्टिक)
- हाऊसवाईफ : होममेकर
- इंडियन वूमन/ वेस्टर्न वूमन : महिला.