युजर आयडी, पासवर्ड कोणाला सांगू नका

By Admin | Published: December 23, 2016 01:56 AM2016-12-23T01:56:31+5:302016-12-23T01:56:31+5:30

आपला आयकर विषयक युजर आयडी आणि पासवर्ड कोणाही अनधिकृत व्यक्तीला सांगू नका, असा सल्ला आयकर विभागाने

User ID, do not tell the password | युजर आयडी, पासवर्ड कोणाला सांगू नका

युजर आयडी, पासवर्ड कोणाला सांगू नका

googlenewsNext

नवी दिल्ली : आपला आयकर विषयक युजर आयडी आणि पासवर्ड कोणाही अनधिकृत व्यक्तीला सांगू नका, असा सल्ला आयकर विभागाने करदात्यांना दिला आहे. गोपनीय माहितीच्या दुरुपयोगामुळे होणारे नुकसान करदात्यांनाच सोसावे लागते, असा इशाराही विभागाने दिला आहे.
आयकर विभागाच्या टीडीएस (स्रोतावर कर कपात) विषयक केंद्रीय प्रक्रिया शाखेने (सीपीसी) करदात्यांसाठी जारी केलेल्या सल्ल्यात ही माहिती देण्यात आली आहे. विभागाने म्हटले की, युजर आयडी आणि पासवर्ड अत्यंत संवेदनशील माहिती आहे. ही माहिती अनधिकृत व्यक्तीला कळल्यास तिचा गैरवापर होऊ शकतो. त्यातून टीडीएससंबंधी माहितीशी छेडछाड होऊ शकते. त्यामुळे करदात्यांच्या संवेदनशील डाटा व अन्य माहिती धोक्यात येऊ शकते.
विभागाच्या ट्रेसेस यंत्रणेवर लॉग-ईन करतानाही खबरदारी घ्यायला हवी. आपला युजर आयडी आणि पासवर्ड अन्य कोणाच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ट्रेसेस यंत्रणा टीडीएस भरणा सुलभतेने करते. तसेच करकपात करणारे तसेच स्वीकारणे यांच्या पातळीवर स्टेटमेंटमध्ये बदल अथवा सुधारणा करण्याची सुविधा प्रदान करते.

Web Title: User ID, do not tell the password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.