पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट

By admin | Published: June 22, 2016 10:44 PM2016-06-22T22:44:47+5:302016-06-23T00:08:06+5:30

नाशिक : शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतांना ग्राहकांची खुलेआम लुट केली जात आहे. अनेक पंपांवर डिजीटल प्रणालीवर आधारित मशिन नसल्याने इंधनामध्ये मोठ्याप्रमाणात तुट आढळून येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे, तर काही ठिकाणी पंपचालकांकडून इंधन सांडवले जाते.

The usual looting of customers on the petrol pump | पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट

पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट

Next

नाशिक : शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतांना ग्राहकांची खुलेआम लुट केली जात आहे. अनेक पंपांवर डिजीटल प्रणालीवर आधारित मशिन नसल्याने इंधनामध्ये मोठ्याप्रमाणात तुट आढळून येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे, तर काही ठिकाणी पंपचालकांकडून इंधन सांडवले जाते.
वाहतुकीस अडथळा ठरणारे फलक हटवावेत
नाशिक : शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फलक लावण्यात आले असून या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्ता पार करतांना देखील वाहतुकीचा अंदाज येत नसल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे फलक हटविण्याची मागणी केली आहे.
ताडपत्री घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी
नाशिक : पावसाळयाला सुरूवात झाली असून नागरिकांनी ताडपत्री विकत घेण्यासाठी शहरातील बाजारपेठेत गर्दी केली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची ताडपत्री घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येते.
आयुक्तालयाजवळ वाहतूक कोंडी
नाशिक : गंगापूररोड येथील नव्यानेच स्थापन झालेल्या पोलीस आयुक्तकार्यालयाजवळ टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी थांबे निर्माण केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
शहरातील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक चुका
नाशिक : शहरातील अनेक सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक चुका ठळकपणे दिसुन येत असून फलकावर सतत बदलणारी वेळ आणि विशीष्ट रंगाचा सिग्नल पडणे यात तफावत आढळून येत असल्याने तांत्रिक दोष दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
उड्डाणपुलाखाली भाजी विक्रेत्यांची गर्दी
नाशिक : नाशिकरोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली बसणारे भाजी विक्रेते आता जागा अपुरी पडतेय म्हणून भाजीविक्रेत्यांनी आता पुलाच्या शेवटच्या टोकाला बसण्यास सुरूवात केली आहे. पोलिस स्टेशन पर्यंत भाजी विक्रेते बसुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पाथर्डी फाटा: खाद्यपदार्थांच्या गाड्या हलवाव्यात
नाशिक : पाथर्डी फाटा येथे पेट्रोल पंपाच्या समोर चायनिज पदार्थ विक्रीच्या गाड्या लावण्यात आल्या असून रात्री उशीरापर्यंत येथे गर्दी असल्याने परिसरातील नागरिकांनी या खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या हटविण्याची मागणी केली आहे.
नव वसाहतींमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
नाशिक : शहरात अनेक ठिकाणी नववसाहती स्थापन होत असून दुकानांच्या संख्येतही वाढ होत आहे. शहराची वाढ होत असतांना पार्किंगसाठी योग्य नियोजन होत नसल्याने व्यावसायिक तसेच ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कचरा जाळण्याचा प्रकार नजरेआड
नाशिक : सातपुर औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत कॉलनी रोड भागात रस्त्याच्या कडेला असणा-या मोकळया जागेतील गवत सर्रास पणे जाळले जात असून या ठिकाणी उभ्या असणा-या अवजड वाहनांना या आगीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वालदेवी नदी प्रदुषणाच्या गर्तेत
नाशिक : देवळाली परिसरातील वालदेवी नदीपात्रातात मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले असून नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरातील नागरिकांनी नदी स्वच्छेतेची मागणी केली आहे. प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: The usual looting of customers on the petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.