उत्कृष्टतेचा आदर आणि सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:02 AM2017-07-30T03:02:58+5:302017-07-30T03:03:12+5:30

भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १९ जुलै २०१७चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय. देशात पहिल्यांदा मीडिया हाऊस असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने

utakarsatataecaa-adara-anai-sanamaana | उत्कृष्टतेचा आदर आणि सन्मान

उत्कृष्टतेचा आदर आणि सन्मान

Next

- अमिताभ श्रीवास्तव

भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १९ जुलै २०१७चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय. देशात पहिल्यांदा मीडिया हाऊस असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात लोकसभा आणि राज्यसभेत आपली कामगिरी व आचरणाने संसदीय लोकशाहीला विशेष प्रतिष्ठा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया सदस्यांचा सन्मान केला. या संसद सदस्यांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी मार्गदर्शक आहे. आधी विधिमंडळ गौरव पुरस्कार आणि नंतर लोकमत संसदीय पुरस्कार देण्यामागे लोकमत समूहाची एक रचनात्मक भावना आहे. संसदेत नुसता गोंधळ घालण्यापेक्षा जनतेच्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप कसे देता येईल, पूर्ण माहितीसह अभ्यासपूर्ण भाषणे कशी केली जातील, विचारांचे आदान-प्रदान कसे होईल, यावर विचार करणे खूपच गरजेचे आहे. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कायदे बनविले आहेत. परंतु अलिकडील काळात संसद असो वा देशभरातील विधिमंडळ, यामध्ये गंभीर चर्चा, तार्किक वादविवादापेक्षा सभागृह ठप्प पाडणे, चर्चा न होऊ देणे, गोंधळाचा फायदा घेऊन विधेयके पारित करून घेण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. समाजसुधारक आणि विचारवंतांना जशी या गोष्टींची चिंता आहे आणि देशातील कोट्यवधी नागरिकांनाही त्यांचा अपेक्षाभंग होण्याचे दु:ख आहे. कारण सुखी आयुष्य, अन्न-वस्त्र-निवारा या सारख्या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी जनतेच्या सर्व अपेक्षा या सभागृहाशी जुळलेल्या आहेत. अशा स्थितीत देशातील तरुणाईच्या मनात असलेला सभागृहाचा आदर एका क्षणालाही कमी होऊ नये, हेच लोकमत समूहाचे प्रयत्न राहिले आहेत.
निरंतर निर्भीड, निष्पक्ष आणि लोकोपयोगी पत्रकारिता करणारा ‘लोकमत’ दलित, पीडित, शोषित, उपेक्षितांच्या हक्कांसाठी नेहमी लढत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध आणि स्वातंत्र्यानंतर जनतेसाठी लढण्याचे व्रत ‘लोकमत’ने परिश्रमपूर्वक जपले आहे. याच क्रमात पुढे संसदेत जनतेच्या
आशा-आकांक्षा पूर्ण करणाºया आदर्श लोकप्रतिनिधींचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ची योजना करण्यात आली. विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी मुख्य अतिथीच्या रूपात तर विविध पक्षांचे वरिष्ठ नेत्यांसोबतच विविध देशांचे राजदूत आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Web Title: utakarsatataecaa-adara-anai-sanamaana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.