उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 06:01 AM2017-08-20T06:01:00+5:302017-08-20T06:01:00+5:30

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले.

Utkal express trains collide in Uttar Pradesh; 23 killed, 40 injured | उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमी

उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमी

Next

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले की, सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत. रेल्वे मंत्रालय सातत्याने उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले की, बचावकार्याला प्राधान्य देत आहोत. अडकून पडलेल्यांना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. घटनास्थळी विजेची व्यवस्था केली आहे. रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी अपघाताबद्दल रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील. (वृत्तसंस्था)

Web Title: Utkal express trains collide in Uttar Pradesh; 23 killed, 40 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.