रेशनसाठी विवाहित,पेन्शनसाठी विधवा झाल्या ४४८७ महिला; उत्तर प्रदेशातील मोठा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:16 PM2024-07-25T12:16:08+5:302024-07-25T12:18:09+5:30

उत्तर प्रदेशातील रेशन घोटाळा समोर आला आहे. येथे एक-दोन नव्हे तर ४४८७ महिला आहेत ज्या विधवा झाल्यानंतर निराधार पेन्शन घेत आहेत आणि रेशनकार्डमध्ये पतीचा वाटाही घेत आहेत.

uttar pradesh 4487 women became married for ration widow for pension big scam | रेशनसाठी विवाहित,पेन्शनसाठी विधवा झाल्या ४४८७ महिला; उत्तर प्रदेशातील मोठा घोटाळा

रेशनसाठी विवाहित,पेन्शनसाठी विधवा झाल्या ४४८७ महिला; उत्तर प्रदेशातील मोठा घोटाळा

केंद्र सरकारने मोफत रेशन योजना सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून अनेकांना मोफत किंवा स्वस्त दरात धान्य मिळत असते. पण या योजनेतही अनेकजण घोटाळा करत असल्याचे समोर आले आहे. असाच एक घोटाळा उत्तर प्रदेशमधून समोर आला आहे, उत्तर प्रदेशात महिला एकाचवेळी पेन्शन आणि रेशनचा लाभ घेतल्याची ४,४८७ प्रकरणे समोर आली आहेत.  ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर निराधार पेन्शन घेत आहेत आणि त्याच महिला शिधापत्रिकेत त्यांच्या पतीचा वाटाही घेत असल्याचे समोर आले आहे. शिधापत्रिकेशी आधार लिंक केल्यानंतर या दोन्ही विभागाच्या हजारो महिला लाभार्थी असल्याचे सत्य समोर आले.

Maharashtra Rain Live Updates : पुण्यात पुराचा धोका, सांगली-कोल्हापुरातही पूरस्थिती; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ही एका जिल्ह्याची आकडेवारी आहे. फूड लॉजिस्टिक्स विभागाने महिला कल्याण विभागाकडून यादी मागवली असता ४ हजार ४८७ महिला महिला कल्याण विभागाकडून पेन्शन घेत असतानाही रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या पतीच्या वाट्याचे रेशन घेत असल्याचे आढळून आले.

जिल्हा पुरवठा अधिकारी कृष्णा गोपाल पांडे यांनी सांगितले की, निराधार महिला पेन्शन लाभार्थ्यांची यादी सरकारकडून प्राप्त झाली आहे, जे त्यांच्या मृत पतीच्या अन्नधान्याचा वाटा रेशनकार्डद्वारे घेत होते. पडताळणीनंतर महिला ज्या योजनेसाठी पात्र असेल ती योजना लागू केली जाईल.

जवळपास तीन वर्षांपासून हा गोंधळ सुरू आहे. एका महिलेला दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळते. अशाप्रकारे तीन वर्षांत त्यांना १६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम पेन्शन म्हणून देण्यात आली आहे. याशिवाय महिलांनी एक युनिट अधिक रेशनचा लाभ घेतला. ही फक्त एका जिल्ह्याची आकडेवारी आहे.

सरकारने त्याची संपूर्ण राज्यात चौकशी सुरु केली आहे. तपासामुळे गरीब कल्याण योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील नऊ हजार आयकर भरणारे व सक्षम व्यक्ती रेशनकार्ड बनवून मोफत धान्याचा लाभ घेत असून गरजू वंचित राहत असल्याचे यापूर्वीच्या तपासात उघड झाले होते. या मोफत रेशनचा लाभ घेत ९,३१३ मोठ्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे, ज्यांनी त्यांच्या शेतातील धान्य सरकारला आधार किमतीवर विकले.

पेरणीनंतर अन्न पणन विभागाने दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख पटवली. ते आपले धान्य सरकारी खरेदी केंद्रांवर विकत राहिले आणि शेतकऱ्यांकडून मोफत रेशन घेत होते. आता पुरवठा विभाग त्यांची चौकशी करून शिधापत्रिका रद्द करणार आहे. अशाप्रकारे लोकांच्या लालसेने रेशनकार्ड, निराधार पेन्शन आणि आयुष्मान कार्डला मोठा फटका बसला आहे.

Web Title: uttar pradesh 4487 women became married for ration widow for pension big scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.