उत्तर प्रदेशात ६ चकमकी, २ गुंड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:15 AM2018-03-26T00:15:09+5:302018-03-26T00:15:09+5:30

उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी गेल्या २४ तासांत राज्यातील सहा चकमकींत दोन गुंडांना ठार मारले

Uttar Pradesh, 6 militants, 2 goons killed | उत्तर प्रदेशात ६ चकमकी, २ गुंड ठार

उत्तर प्रदेशात ६ चकमकी, २ गुंड ठार

Next

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी गेल्या २४ तासांत राज्यातील सहा चकमकींत दोन गुंडांना ठार मारले. २० मार्च, २०१७ पासून पोलिसांनी सुरू केलेल्या गुंडांविरुद्धच्या या मोहिमेत या दोन जणांसह ४५ जण ठार झाले आहेत. १२ गुंड तर यावर्षीच ठार झाले आहेत.
गुंडांचा प्रचंड प्रभाव असलेल्या गाझियाबादेत गेल्या २४ तासांत १८२ गुन्हेगारांना अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नोएडा, गाझियाबाद, सहारणपूर आणि मुझ्झफरनगरमधील गुन्ह्यांत हवे असलेले अनेक गुन्हेगार पोलिसांनी शनिवारी रात्री सुरू केलेल्या शोध मोहिमेत शोधून काढले. दिल्ली आणि नोएडातील हत्यांप्रकरणी श्रावण चौधरी हवा होता. तो रविवारी सकाळी थोड्याशा गोळीबारा नंतर ठार मारला गेला. त्याच्या अटकेसाठी एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झाले होते. चौधरीकडे एके-४७ अ‍ॅसॉल्ट रायफल आणि ३१५ बोअरची गन सापडली. सहारनपूर येथे चकमकीत सलीम नावाचा गुंड ठार झाला तर त्याचा सोबती पळून गेला. सलीमवर एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झालेले होते.
चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांनी एक लाख रूपये, मोटारसायकल व पिस्तोल जप्त केले. सरसवा आणि मंडी पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना गुंड चिलकाना येथून दुचाकीवर येत असल्याचे दिसले. त्यांनी त्यांना थांबण्यास सांगितल्यावर त्यांनी न थांबता पोलिसांवर गोळीबार सुरू केला. सहारनपूरचे उप पोलिस अधीक्षक बबलू कुमार म्हणाले
की, आम्हाला ही घटना
समजताच आम्ही कसून
तपासणी सुरू केली. चकमकीत एक कर्मचारी जखमी झाला. ठार झालेला गुन्हेगार यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांत सहभागी होता.

Web Title: Uttar Pradesh, 6 militants, 2 goons killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.