आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले, पायलटसह 2 जणांनी शेतात उड्या घेत स्वतःचा जीव वाचवला; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 05:43 PM2024-11-04T17:43:31+5:302024-11-04T17:44:36+5:30

या दुर्घटनेनंतर, तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी संबंधित सर्व संस्थांना सतर्क करण्यात आले आहेत.

uttar pradesh Air force plane crashes in Agra, 2 including pilot save their lives by jumping into fields | आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले, पायलटसह 2 जणांनी शेतात उड्या घेत स्वतःचा जीव वाचवला; बघा VIDEO

आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले, पायलटसह 2 जणांनी शेतात उड्या घेत स्वतःचा जीव वाचवला; बघा VIDEO

उत्तर प्रदेशातील आगरा येथे सोमवारी (4 नोव्हेंबर 2024) एक मोठी दुर्घटना घडली. हवाई दलाच्या विमानाने आकाशातच पेट घेतला. ही आग वाढल्यानंतर विमान एका शेतात कोसळले. दरम्यान, अपघातावेळी विमानातील पायलट आणि आणखी एका व्यक्तीने उड्यामारून आपला जीव वाचवला. विमान जमीनवर कोसळताच आग आणखी भडकली. ही दुर्घटना आगरा येथील कागारौल भागातील सोंगा गावाजवळ घडली.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलीसह घटनास्थळी पोहोचत आहेत. विमान शेतात कोसळताना पाहून गावातील लोकही तेथे पोहोचले. या दुर्घटनेनंतर, तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी संबंधित सर्व संस्थांना सतर्क करण्यात आले आहेत.

पंजाबमधून केले होते उड्डाण -
एएनआय या वृत्त संस्थेने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हे मिग-29 विमान होते. याने पंजाबमधील अदमपुर येथून उड्डाण घेतले होते. विमान रूटीन एक्सरसाइजसाठी आगरा येथे जात होते. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बघा व्हिडिओ - 

Web Title: uttar pradesh Air force plane crashes in Agra, 2 including pilot save their lives by jumping into fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.