Uttar Pradesh Assembly Election: आमच्या मुलांना तिकिट द्या; हवंतर आम्ही...; 'त्या' १८ खासदारांमुळे भाजप नेतृत्त्व पेचात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:42 AM2022-01-21T06:42:40+5:302022-01-21T06:43:54+5:30

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलाला किंवा मुलीला तिकीट मागणाऱ्या भाजप खासदारांची संख्या आता १८ झाली आहे.

Uttar Pradesh Assembly Election 18 bjp mp wants ticket for their son daughters | Uttar Pradesh Assembly Election: आमच्या मुलांना तिकिट द्या; हवंतर आम्ही...; 'त्या' १८ खासदारांमुळे भाजप नेतृत्त्व पेचात

Uttar Pradesh Assembly Election: आमच्या मुलांना तिकिट द्या; हवंतर आम्ही...; 'त्या' १८ खासदारांमुळे भाजप नेतृत्त्व पेचात

Next

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलाला किंवा मुलीला तिकीट मागणाऱ्या भाजप खासदारांची संख्या आता १८ झाली आहे. यातील ११ जणांनी लिहून दिले आहे की, ते २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लढणार नाहीत. त्यामुळे मुलांना तिकीट द्यावे. अलाहाबादच्या खा. रीता बहुगुणा जोशी यांनी तर आपल्या मयंक या पुत्राला लखनऊ कँटमधून तिकीट मिळताच लोकसभेचा राजीनामा देऊ, असे म्हटले आहे. यामुळे कुटुंबातील एकच व्यक्ती राजकारणात राहील व पक्षावर घराणेशाहीचा आरोपही होणार नाही.

Web Title: Uttar Pradesh Assembly Election 18 bjp mp wants ticket for their son daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.