Uttar Pradesh Assembly Election 2022 : मत न देणाऱ्यांसाठी योगींनी मागवले बुल्डोजर, JCB; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:42 PM2022-02-15T12:42:14+5:302022-02-15T12:43:47+5:30
राजासिंह यांनी त्यांच्या व्हिडिओ मैसेजची सुरुवात 'भारत माता की जय' आणि 'जय सियाराम' अशा घोषणांनी केली. ते म्हणाले, "काही भागांत सर्वाधिक मतदान झाले आहे. मला वाटते की, ज्यांना योगीजी पसंत नाहीत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे.
उत्तर प्रदेशात दोन टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघाचे आमदार टी राजा सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हिंदूंना भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, जे योगी आदित्यनाथ यांना मतदान करणार नाहीत त्यांच्यासाठी हजारो बुलडोझर मागविण्यात आले आहेत.
राजासिंह यांनी त्यांच्या व्हिडिओ मैसेजची सुरुवात 'भारत माता की जय' आणि 'जय सियाराम' अशा घोषणांनी केली. ते म्हणाले, "काही भागांत सर्वाधिक मतदान झाले आहे. मला वाटते की, ज्यांना योगीजी पसंत नाहीत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. मी उत्तर प्रदेशातील हिंदू मतदारांना बाहेर पडत मतदान करण्याचे आवाहन करतो. जे लोक भाजपला मत देत नाहीत, त्यांच्यासाठी योगीजींनी हजारो जेसीबी आणि बुल्डोजर मंगवले आहेत.''
राजासिंह पुढे म्हणाले, "निवडणुकीनंतर, ज्यांनी योगीजींना पाठिंबा दिला नाही अथवा जे देणार नहीत, त्या सर्व भागांची ओळख पटवली जाईल. आणि माहीत आहे ना जेसीबी व बुलडोझर कशासाठी वापरतात? मी यूपीतील त्या गद्दारांना (ज्यांना योगीजी पुन्हा सीएम होऊ नये, असे वाटते) सांगू इच्छितो की, तुम्हाला उत्तर प्रदेशात राहायचे असेल तर योगी-योगी म्हणावे लागेल अन्यथा तुम्हाला यूपी सोडावी लागेल.''