UP Election 2022 : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद निवडणुकीच्या आखाड्यात; CM योगींना देणार थेट टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 01:42 PM2022-01-20T13:42:43+5:302022-01-20T13:44:09+5:30
योगी आदित्यनाथ हेही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी गोरखपूर सदर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या जागेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक रिंगणात आहेत. (Uttar Pradesh Assembly Election 2022)
योगी आदित्यनाथ हेही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते. योगी 1998 मध्ये पहिल्यांदा गोरखपूरमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी गोरखपूरमधून सलग 5 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला.
आझाद या लोकांविरोधात उमेदवार उतरवणार नाहीत -
प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (पीएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल सिंह यादव, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर, राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह काही लोकांविरोधात आपला पक्ष उमेदवार उभा करणार नाही, असे आझाद यांनी म्हटले आहे. तसेच, अखिलेश यादव यांनी निवडणूक लढवल्यास पक्ष त्यांच्यासमोरही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार नाही, असेही ते म्हणाले.
बहुत - बहुत आभार साधुवाद। पिछले 5 साल भी लड़ा हूँ। अब भी लड़ूंगा। जय भीम,जय मण्डल। बहुजन हिताय, बहुजन सुखाय। https://t.co/FROhXhttiv
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) January 20, 2022
आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी मंगळवारीच म्हटले होते, की उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने 100 जागा दिल्या तरी मी त्यांच्याशी युती करणार नाही. आझाद ग्रेटर नोएडा येथे पत्रकार परिषदेत म्हणाले, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात एकट्याने निवडणूक लढवणार आहे आणि समाजवादी पक्षाशी चर्चा न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.