Uttar Pradesh Assembly Election 2022: पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, मथुरेत EVM झाले खराब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:34 AM2022-02-10T08:34:15+5:302022-02-10T08:35:41+5:30
मेरठ येथील 7 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून येथे 26 लाख मतदान आहे. मतदारांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे.
लखनौ - देशात 5 राज्यांच्या निवडणुकांचा जोर पाहायला मिळत असून राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी चांगलंच तापलं आहे. त्यात, आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी, 623 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात स्वत:ला सिद्ध करणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून थंडीचा जोर असतानाही मतदारराजा केंद्रांवर पोहचत आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
मेरठ येथील 7 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून येथे 26 लाख मतदान आहे. मतदारांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे. अनेक मतदारसंघातील केंद्रावर उमेदवार मंडळीही हजर झाली असून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, मतदान शांततेत सुरू असतानाच मथुरा आणि मुझफ्फरनगर येथील केंद्रावर ईव्हीएम बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.
People form queues at booth number 299 - at Public Inter College - in Kairana as voting for the first phase of #UttarPradeshElections begins. pic.twitter.com/GYEBLkXypH
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 10, 2022
मथुरा येथील बलदेव विधानसभा क्षेत्रातील फरह येथे ईव्हीएम मशिन खराब झाले आहे. येथील बुथ क्रमांक 442 वर ईव्हीएम मशिन खराब झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे, मतदारांची केंद्राबाहेर मोठी रांग लागली आहे. दरम्यान, यापूर्वी मुजफ्फरनगरच्या इस्लामिया इंटर कॉलेज पोलींग बुथावरही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच माहिती समोर आली आहे.
Polling process has started at all booths. Some complaints regarding EVMs received from some random booths, we are replacing those machines and resolving their matter. Peaceful polling underway, no law & order situation anywhere: Jasjit Kaur, Shamli DM #UttarPradeshElectionspic.twitter.com/yktYRIhiu0— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 10, 2022
दरम्यान, सर्व मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. काही केंद्रावरुन मतदान यंत्रात बिघाड असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तेथील मतदान यंत्र बदलून देत अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळीकडे शांततेत मतदान सुरू आहे, असे शामली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी म्हटले आहे.