Uttar Pradesh Assembly Election 2022 : उमेदवारी अर्ज भरायला झाला उशीर, वकिलांसह मंत्री महोदय पळतच सुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 01:22 PM2022-02-05T13:22:35+5:302022-02-05T13:31:00+5:30
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उपेंद्र तिवारी यांनी फेफना विधानसभा मतदारसंघातून 4 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला
लखनौ - निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्यादिवशी शक्तीप्रदर्शन करत आणि सर्वांचे अर्ज दाखल झाल्यानंतरच आपण भरावा, अशी अनेकांची मनस्थिती असते. त्यानुसार, उमेदवाराची शेवटच्यादिवशी अर्ज भरताना चांगलीच दमछाक होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठीही एका उमेदवाराची अशीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राज्याचे क्रीडामंत्री असलेल्या उपेंद्र तिवारी यांनी धावत-पळत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचावं लागलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उपेंद्र तिवारी यांनी फेफना विधानसभा मतदारसंघातून 4 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, अर्ज भरण्याची वेळ आणि मुदत संपत असल्याने त्यांनी थेट धावत-पळत कार्यालय गाठले. सगळ्यात हारांच्या माळा आणि सोबत वकिल मंडळींना घेऊन ते पळत-पळत अर्ज भरण्यासाठी पोहोचले. यावेळी, माध्यम प्रतिनीधींनी त्यांचा व्हिडिओ शूट केला. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ते जोरजोरात पळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
#WATCH | UP Sports Minister Upendra Tiwari sprinted to Collectorate Office in Ballia y'day as he was running late to file his nomination. Y'day nominations were scheduled to be filed by 3 pm & the minister was running late, nomination process still ongoing#UttarPradeshElectionspic.twitter.com/99HSIPHwoA
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 5, 2022
उपेंद्र तिवारी यांच्या अर्जातील संपत्ती विवरणपत्रानुसार गेल्या 5 वर्षांत त्यांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ झाली आहे. उपेंद्र यांची संपत्ती 2 कोटी 85 लाख 74 हजार 632 रुपए एवढी आहे. यापूर्वी, 2017 मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांची संपत्ती 1 कोटी 21 लाख 50 हजार 33 रुपये एवढी होती. त्यामुळे, यंदाच्या शपथपत्रानुसार त्यांच्या संपत्तीत 5 वर्षात दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून येते.